मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pandharpur Bus Accident : पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात; एक ठार, ४२ जखमी

Pandharpur Bus Accident : पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात; एक ठार, ४२ जखमी

Jan 18, 2023, 02:53 PM IST

  • Solapur Bus Accident : चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं भरधाव बस महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटली. त्यामुळं या अपघातात तब्बल ४२ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Bus Accident In Pandharpur (HT)

Solapur Bus Accident : चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं भरधाव बस महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटली. त्यामुळं या अपघातात तब्बल ४२ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • Solapur Bus Accident : चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं भरधाव बस महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटली. त्यामुळं या अपघातात तब्बल ४२ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Huljanti bus Accident : पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हुलजंती ते मंगळवेढा हायवेवर हा अपघात झाला असून यात एका भाविकाचा मृत्यू तर तब्बल ४२ भाविक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सकाळी सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून त्यानंतर प्रशासनाकडून घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. बसमधील सर्व प्रवासी हे उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Palghar Crime: आधी सोशल मीडियावरून केली मैत्री, नंतर भेटायला बोलावून केले कांड! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मेट्रिमोनियल साईटवरून तब्बल २२ मुलींची फसवणूक तर ७ तरुणींना लग्न करून गंडवले, आरोपीला अटक

somaiya school: पॅलेस्टाईन-इस्त्रायल संघर्षासंदर्भात पोस्टला Like करणे भोवले; मुख्याध्यापिकेला नोकरीवरून काढले

Pune warje firing : बारामतीमध्ये मतदान संपताच पुण्यातील वारजे माळवाडीत गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या तिघांनी केले फायरिंग

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील काही भाविक एका खाजगी बसमधून देवदर्शनासाठी निघाले होते. कर्नाटकातील एका मंदिरात देवदर्शन घेतल्यानंतर सर्व भाविक बसमधून पंढरपुरच्या दिशेनं निघाले होते. यावेळी बस हुलजंती ते मंगळवेढा रोडवर आली असता चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर बस महमार्गालगतच्या एका खड्ड्यात कोसळली. त्यामुळं झालेल्या अपघातात एका भाविकाचा मृत्यू झाला असून तब्बल ४२ भाविक गंभीर जखमी झाले. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू केलं आहे.

बस अपघातात जखमी झालेल्या भाविकांना मंगळवेढ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काही भाविकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. याशिवाय ज्या भाविकांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना सोलापुरातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर आता भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात कशामुळं झाला, याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा