मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sadhna Patel : भाजप नेत्यानं थेट पोलिसांवर उगारली चप्पल; वाळू माफियांवर कारवाईवेळी जोरदार राडा

Sadhna Patel : भाजप नेत्यानं थेट पोलिसांवर उगारली चप्पल; वाळू माफियांवर कारवाईवेळी जोरदार राडा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 18, 2023 01:59 PM IST

sadhna patel viral video : वाळू माफियांविरोधात कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांना अरेरावी करत भाजपच्या महिला नेत्यानं चप्पल उगारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

sadhna patel viral video
sadhna patel viral video (HT)

chitrakoot madhya pradesh crime news : वाळू माफियांविरोधात कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांना भाजपच्या महिलांना नेत्यांनं अरेरावी करत मारण्यासाठी चप्पल उगारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशातील चित्रकुटमध्ये हा संतापजनक प्रकार घडला असून पोलिसांनी या प्रकरणात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साधना पटेल असं आरोपी भाजप नेत्याचं असून त्या नगराध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून पोलिसांना मारहाणीचा प्रयत्न करणाऱ्या साधना पटेल यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील चित्रकूट पोलीस ठाणे क्षेत्रातील पाथर गावात वाळूची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी स्थानिक नायब तहसीलदार यांच्यासह एक विशेष पथक पाथर गावात माफियांविरोधात कारवाई करण्यासाठी पोहचलं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी वाळू तस्करी करत असलेला एक जेसीबी आणि ट्रॅक्टर जप्त केला. त्यानंतर या घटनेची माहिती समजताच भाजप नेत्या आणि नगराध्यक्ष साधना पटेल यांनी समर्थकांसह घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी केलेल्या कारवाईचा विरोध केला. पोलिसांनी त्यांना प्रकरणाची माहिती दिली. त्यावेळी साधना पटेल या पोलिसांवर भडकल्या. पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत साधना पटेल यांनी पोलिसांना मारण्यासाठी चप्पल उगारली. त्यानंतर पोलिसांनी जप्त केलेली वाहनं घेऊन साधना पटेल यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला.

घडलेल्या प्रकाराबाबत नायब तहसीलदार सुमित गुर्जर यांनी पोलिसांत साधना पटेल यांच्यासह आठ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. भाजप नेत्या साधना पटेल यांचं कुटुंबच वाळू माफियांशी संबंधित असल्यामुळं त्यांनी पोलिसांवर चप्पल उगारली. साधना पटेल आणि पोलिसांमधील राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आरोपींना तातडीनं अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

IPL_Entry_Point