मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nilesh Rane on Kesarkar : नोकरी मागायची आहे तर नीट मागा; नीलेश राणेंचा केसकरांना टोला

Nilesh Rane on Kesarkar : नोकरी मागायची आहे तर नीट मागा; नीलेश राणेंचा केसकरांना टोला

Aug 07, 2022, 10:43 AM IST

    • शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि राणे यांचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. नीलेश राणे यांनी ट्विट करत केसकरांना टोला लगावला आहे.  
नीलेश राणे-दीपक केसरकर

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि राणे यांचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. नीलेश राणे यांनी ट्विट करत केसकरांना टोला लगावला आहे.

    • शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि राणे यांचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. नीलेश राणे यांनी ट्विट करत केसकरांना टोला लगावला आहे.  

मुंबई : राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याने शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हे चांगलेच अस्वस्त झाले आहेत. त्यांनी दोन दिसवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घाणाघात केला होता. केसकर म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते. नारायण राणे यांनी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची बदनामी केल्याने ते व्यथित झाले होते. त्यानंतर, नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केसरकरांना प्रत्युत्तर दिले. यानंतर उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली होती. यानंतर प्रवक्ते पदावरून केसरकर यांची उचलबांगडी होणार असल्याचे वृत्त आले. यामुळे आता राणे आणि केसरकर यांचा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे. नीलेश राणे यांनीही या वादात उडी घेत ट्विट करत केसारकरांना टोला लागवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

Mumbai Fire: मुंबईच्या अंधेरीत गॅस पाइपलाइन लिकेज झाल्याने आग, ४ जण होरपळले; रुग्णालयात उपचार सुरू

Sunday Mega Block 05 May 2024: मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; कुठून किती वाजता सुटणार लोकल? वाचा

Lok Sabha Elections 2024: काँग्रेसला धक्का! संजय निरुपम यांचा पत्नी आणि मुलीसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राणे पिता पुत्रांनी आदित्य ठाकरेंची बदनामी केल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केला. एवढेच नाही तर नारायण राणे यांच्यामुळे युती फिसकटल्याचा खळबळजनक दावा केसरकर यांनी केला होता. एवढेच नाही तर याची तक्रार करण्यासाठी मी पंतप्रधानांना वैयक्तिक संपर्क करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण पंतप्रधानांपर्यंत पोहोचल्यावर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात संवाद सुरु झाला आणि त्यानंतर दोघांची भेट झाली असेही केसरकर म्हणाले.

दरम्यान, केसरकरांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी नितेश राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आहे. हिंदुत्ववाचा विचार आजून प्रखर झाला पाहीजे. यासाठी १६६ आमदार एकत्र आले आहेत. हिंदुत्वाचे रक्षण करणे आणि हिंदुत्वाला ताकद देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यामुळे आमच्यासाठी हिंदुत्व हा विषय महत्वाचा आहे. हिंदुत्वासाठी सगळ्या गोष्टी माफ आहेत, येवढेच मी सांगतो, असे नितेश राणे म्हणाले.

नितेश राणे यांच्या नंतर नीलेश राणे यांनीही केसरकरांवर हल्ला चढवला आहे. त्यांनी ट्विट करत महटले आहे की, दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा. १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे, अशा शब्दात निलेश राणेंनी दिपक केसरकर यांना खोचक टोला लगावला आहे.

दोघांच्याही या आरोप प्रत्यारोपमुळे आता राणे विरुद्ध केसरकर असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. केसरकरांनी परस्पर पत्रकार परिषद घेत आरोप केल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे याची तक्रार गेली आहे. यामुळे शिंदे गटाचे प्रवक्ते पदावरून त्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.