मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chhagan Bhujbal: सरस्वती पूजन वादावर भुजबळांचे स्पष्टीकरण; म्हणाले, मी सुद्धा हिंदू

Chhagan Bhujbal: सरस्वती पूजन वादावर भुजबळांचे स्पष्टीकरण; म्हणाले, मी सुद्धा हिंदू

Sep 29, 2022, 03:42 PM IST

    • Chhagan Bhujbal: छगन भुजबळ म्हणाले की, माझ्या वक्तव्याचे राजकारण करण्यात येत आहे. समता परिषदेच्या कार्यक्रमात मी माझं मत मांडलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ म्हणाले की, माझ्या वक्तव्याचे राजकारण करण्यात येत आहे. समता परिषदेच्या कार्यक्रमात मी माझं मत मांडलं होतं.

    • Chhagan Bhujbal: छगन भुजबळ म्हणाले की, माझ्या वक्तव्याचे राजकारण करण्यात येत आहे. समता परिषदेच्या कार्यक्रमात मी माझं मत मांडलं होतं.

Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती पुजनाबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. आता या वादानंतर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत, तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं.

ट्रेंडिंग न्यूज

परभणीत ऑनर किलिंग..! प्रेम विवाहाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीचा केला ‘सैराट’ अंत

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

स्पष्टीकरण देताना छगन भुजबळ म्हणाले की, माझ्या वक्तव्याचे राजकारण करण्यात येत आहे. समता परिषदेच्या कार्यक्रमात मी माझं मत मांडलं होतं आणि प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीडशे पूर्ण होणार आहेत त्यानिमित्त हा कार्यक्रम होता.

कार्यक्रमात बोलताना, शाळेत पहिल्या दिवशी सरस्वतीची पूजा करतो. पण छत्रपती शिवाजी महाराजा, ज्योतिबा फुले, अण्णासाहेब कर्वे आदी महापुरुषांची पूजा करत नाही. ते आपले देव आहे, त्यांची पूजा का करत नाही, या लोकांनी आपल्या शिक्षणाची दारे उघडली. त्यांना विरोध सहन करावा लागला. तशाही परिस्थितीत शिक्षणाची दारे आपल्याला उघडी केली. आपण त्यांची पूजा करण्याऐवजी सरस्वती देवीची पूजा करतो. त्यामुळे देवीच्या ऐवजी महापुरुषांची पूजा करावी इतकंच सांगण्याचा माझा उद्देश होता असं भुजबळ म्हणाले.

भुजबळ यांनी पुढे सांगितले की,"मी कोणाचेही फोटो काढा आणि लावा असं म्हटलं नव्हतो. माझ्या वक्तव्याचा राजकीय मुद्दा बनवला जातोय. मीसुद्धा हिंदू आहे. नाशिकमधील अनेक मंदिरांची कामे केलीय. कुंभमेळ्यासाठीही भरपूर काम केलं आहे. माझ्या घरीसुद्धा देवदेवतांची पूजा होते. सर्वजण देवीच्या दर्शनाला जातो. कोणत्या कुटुंबात देवाची पूजा करता हा ज्याचा त्याचा विषय आहे, पण शाळेत महापुरुषांचे फोटो बाजूला ठेवून देवीची पूजा करणे योग्य नाही इतकेच माझे म्हणणे आहे."

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा