मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : “महाराष्ट्रात याआधी असं होत नव्हतं, दौरा सोडून हात दाखवणे...”; पवारांचा शिंदेंना टोला

Sharad Pawar : “महाराष्ट्रात याआधी असं होत नव्हतं, दौरा सोडून हात दाखवणे...”; पवारांचा शिंदेंना टोला

Nov 24, 2022, 05:37 PM IST

  • Sharad Pawar On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांनी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिरात जाऊन ज्योतिषाला आपला हात दाखवल्याचे प्रकरण समोर आले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. 

पवारांचा शिंदेंना टोला

Sharad Pawar On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांनी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिरात जाऊन ज्योतिषाला आपला हात दाखवल्याचे प्रकरण समोर आले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

  • Sharad Pawar On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांनी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिरात जाऊन ज्योतिषाला आपला हात दाखवल्याचे प्रकरण समोर आले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. 

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे बुधवारी शिर्डी दौऱ्यावर होते. तिथं त्यांनी सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. याच दौऱ्यात ते एका ज्योतिषाकडं जाऊन भविष्य पाहून आले. त्यावरूनआता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर अचानक आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर शिंदे यांनी ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपले भविष्य जाणून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनीही यावर टिप्पणी करत शिंदे यांना टोला लगावला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

परभणीत ऑनर किलिंग..! प्रेम विवाहाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीचा केला ‘सैराट’ अंत

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

शरद पवार म्हणाले की, पुरोगामी विचारांचे राज्य असा लौकिक असलेल्या महाराष्ट्रात संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून या नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. मात्र जनता या गोष्टीचा स्वीकार करत नाही. आसाममध्ये काय घडलं हे सर्व देशाला माहिती आहे. आता पुन्हा एकदा आसामची सहल होणार असल्याचे समजले. शिर्डीला जाणे आणि नंतर सिन्नरला जाऊन कोणाला तरी हात दाखवणे या गोष्टी आमच्यासाठी नवीन आहेत, असा खोचक टोला पवारांनी लगावला.

सरकारच्या स्थिरतेबद्दल वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जात आहेत. दोन महिन्यांत हे सरकार कोसळेल असा दावा केला जात आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मी काही ज्योतिषी नाही, त्यामुळे मी काही सांगू शकणार नाही. माझा त्यावर विश्वासही नाही, त्यामुळे मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही. आपण आता हल्ली नवीन गोष्टी पाहत आहोत. महाराष्ट्रात याआधी असे होत नव्हते, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल शिर्डी दौऱ्यावर होते. तिथं त्यांनी सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. याच दौऱ्यात ते एका ज्योतिषाकडं जाऊन भविष्य पाहून आले. त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिंदे यांना उपरोधिक शब्दांत टोले हाणले आहेत. जग कुठं चाललंय आणि एका पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिषाकडं जाऊन भविष्य बघतात, काय बोलायचं मी हतबल आहे, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.