मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nana Patole : हा ऊन सावलीचा खेळ आहे, सरकारला धोका नाही : नाना पटोले

Nana Patole : हा ऊन सावलीचा खेळ आहे, सरकारला धोका नाही : नाना पटोले

Jun 21, 2022, 12:10 PM IST

  • काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) मुंबईला (Mumbai) येत आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारला कोणताही धोका नसल्याचं पटोले म्हणालेत.

नाना पटोले (हिंदुस्तान टाइम्स)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) मुंबईला (Mumbai) येत आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारला कोणताही धोका नसल्याचं पटोले म्हणालेत.

  • काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) मुंबईला (Mumbai) येत आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारला कोणताही धोका नसल्याचं पटोले म्हणालेत.

काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. मुंबईत आपण आपल्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलवली आहे. आपण मुंबईत (Mumbai) जाऊन चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांच्या पराभवावर विचारविनिमय करणार असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

परभणीत ऑनर किलिंग..! प्रेम विवाहाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीचा केला ‘सैराट’ अंत

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

नागपूर इथं पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले नाना पटोले पाहुयात.

नाना पटोले यांच्या म्हणण्यानुसार राज्यात महाविकास आघाडी सरकारला काही धोका आहे असं म्हणणं चुकीचं आहे. भाजपनं काही आमदार फोडण्याचा प्रयत्न केला हे जरी खरं असलं तरी त्यानं महाविकास आघाडीच्या सरकारला काहीही धोका पोहोचणार नाही. चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाचं चिंतन आज मी मुंबईत बोलावलेल्या बैठकीत केलं जाणार आहे. पक्षाच्या आमदारांनी पक्षविरोधी भूमिका का घेतली याची कारणीमिमांसा केली जाईल. पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई केली जाईल. हा ऊन सावलीचा खेळ आहे. यापूर्वीही भाजपने असा प्रयत्न केला होता मात्र तो प्रयत्नही फोल ठरला होता. हा अंधार लवकरच दूर होईल असा मला विश्वास आहे असं नाना पटोले म्हणालेत

तर भाई जगताप यांनीही याबाबत बोलताना काहीतरी गडबड आहे हे मान्य करावं लागेल मात्र त्यानं महाविकास आघाडी सरकारला काही धोका निर्माण होणार नाही असं सांगितलं. काँग्रेसच्या पहिल्या पसंतीचा उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत झाल्याने काँग्रेसकडूनही आता नाराजी उघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदारांना संध्याकाळी ४  वाजता मुंबईत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काँग्रेस मानहानीकारक पराभवानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्याचे संकेतही दिले आहेत.

संजय राऊत यांनीही सरकारला धोका नसल्याचं केलं स्पष्ट

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. 'आमच्या काही आमदारांचा संपर्क होत नव्हता हे सत्य आहे. मात्र, आज सकाळपासून अनेक आमदारांचा संपर्क झाला आहे. एकनाथ शिंदेंशीही संपर्क झाला आहे. बाहेर जे चित्र निर्माण केलं जात आहे, त्यात तथ्य नाही. शिवसेनेच्या बाबतीत काही ठिकाणी संशयास्पद वातावरण निर्माण केलं गेलं आहे. तेही दूर होईल, असं ते म्हणाले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा