मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vande Bharat : मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा शनिवारी होणार लोकार्पण सोहळा अखेरच्या क्षणी रद्द

Vande Bharat : मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा शनिवारी होणार लोकार्पण सोहळा अखेरच्या क्षणी रद्द

Jun 03, 2023, 12:27 AM IST

  • Mumbai goa vande bharat : कोकणवासीयांना सुविधाजनक ठरणारी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचं शनिवारी (३ जून) रोजी होणारा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला आहे. ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण रद्द करण्यात आलं आहे.

vande bharat

Mumbai goa vande bharat : कोकणवासीयांना सुविधाजनक ठरणारीमुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचंशनिवारी (३जून) रोजी होणारा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला आहे. ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण रद्द करण्यात आलं आहे.

  • Mumbai goa vande bharat : कोकणवासीयांना सुविधाजनक ठरणारी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचं शनिवारी (३ जून) रोजी होणारा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला आहे. ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण रद्द करण्यात आलं आहे.

मुंबई – कोकणवासीयांना सुविधाजनक ठरणारी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचं शनिवारी (३ जून) रोजी होणारा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी साडे दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते. तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मडगाव रेल्वे स्टेशनवर उपस्थित राहणार होते. पण ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण रद्द करण्यात आलं आहे. अश्विनी वैष्णव ओडिशा ट्रेन अपघाताच्या घटनास्थळी जात आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

परभणीत ऑनर किलिंग..! प्रेम विवाहाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीचा केला ‘सैराट’ अंत

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

ओडिसाच्या बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ५० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.

 

मुंबई-मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा शनिवारी होणारा उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.'वंदे भारत एक्स्प्रेस'चा उद्घाटन कार्यक्रम मडगाव येथे पडणार होता. उद्या होणाऱ्या कार्यक्रमासाठीची तयारी पूर्ण झाली होती. मात्र,अपघातामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.

 

मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस कोकणवासियांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्याला सहा दिवस चालवण्याचं सध्या प्लॅनिंग आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मडगाव, थिविम, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल,  ठाणे, दादर, सीएसएमटी या स्थानकांवर वंदे भारत ट्रेन थांबेल. सध्या दिलेल्या प्रस्तावानुसार,सीएसएमटी वरून सकाळी ५.३५लावंदे भारत सुटेल, तर मडगाव येथे दुपारी१.१५वाजता पोहोचेल. त्यानंतर लगेच मडगाव वरुन तीच वंदे भारत दुपारी २.३५ वाजता मुंबईकडे रवाना होईल आणि रात्री १०.२५ वाजता ट्रेन मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. वंदे भारत एक्सप्रेस ही कोकण मार्गावर धावणारी सर्वात जलद एक्सप्रेस असणार आहे. तेजस एक्सप्रेसपेक्षा देखील एक तास लवकर ही ट्रेन मडगावला पोहोचेल, त्यामुळे या ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.

 

माहिती मिळत आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा