मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुख होऊ शकतात का? शिवसेनेची घटना काय सांगते

एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुख होऊ शकतात का? शिवसेनेची घटना काय सांगते

Jun 25, 2022, 10:05 AM IST

    • उद्धव ठाकरे यांनी फक्त मुख्यमंत्रीपदच नव्हे तर मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार असल्याचं म्हटलं होतं. एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेणार का? ते शिवसेना पक्षप्रमुख होऊ शकतात का? त्यासाठी कायदेशीर बाजू काय आहे इत्यादी बाबी पाहाव्या लागतील.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

उद्धव ठाकरे यांनी फक्त मुख्यमंत्रीपदच नव्हे तर मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार असल्याचं म्हटलं होतं. एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेणार का? ते शिवसेना पक्षप्रमुख होऊ शकतात का? त्यासाठी कायदेशीर बाजू काय आहे इत्यादी बाबी पाहाव्या लागतील.

    • उद्धव ठाकरे यांनी फक्त मुख्यमंत्रीपदच नव्हे तर मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार असल्याचं म्हटलं होतं. एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेणार का? ते शिवसेना पक्षप्रमुख होऊ शकतात का? त्यासाठी कायदेशीर बाजू काय आहे इत्यादी बाबी पाहाव्या लागतील.

राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळणार अशी चर्चा होत आहे. यासाठीच शिंदे गटाकडून विद्यमान आमदारांसह माजी आमदारांनाही गुवाहाटीला बोलावलं जात असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, या सर्व चर्चेवर विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी ही सर्व खोटी माहिती पसरवली जात असल्याचं म्हटलं आहे. तसंच शिवसेनेची स्वतंत्र घटना आहे. ती निवडणूक आयोगानुसार तयार करण्यात आलेली आहे. शिवसेनेचा विधीमंडळ पक्ष वेगळा आणि मूळ पक्ष वेगळा आहे असंही त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फक्त मुख्यमंत्रीपदच नव्हे तर मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार असल्याचं म्हटलं होतं. एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेणार का? ते शिवसेना पक्षप्रमुख होऊ शकतात का? त्यासाठी कायदेशीर बाजू काय आहे इत्यादी बाबी पाहाव्या लागतील.

ट्रेंडिंग न्यूज

परभणीत ऑनर किलिंग..! प्रेम विवाहाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीचा केला ‘सैराट’ अंत

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

सध्या गुवाहाटीत असलेल्या शिंदे यांच्या गटाला मान्यता मिळवायची असेल तर त्यांना विधीमंडळ सभागृहातच यावं लागेल. त्यांच्यासमोर अनेक तांत्रिक मुद्दे अडचणीचे ठरू शकतात. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पावले उचलली जात आहेत. यात त्यांनी सुरुवातीला १२ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. ही मागणी विधानसभा उपाध्यक्षांनी मान्य केली आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे असंही सध्या म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्ष बहुमत की अल्पमतात हे विधिमंडळातच ठरवता येईल.

शिवसेना प्रमुखाची निवड कशी होते?
प्रत्येक पक्षाची एक घटना असते आणि त्यानुसार काही नियम आणि अधिकार ठरवण्यात आलेले असतात. निवडणूक आयोगाला पक्षाने त्यांची घटना दिलेली असते. त्या घटनेनुसारच पक्षाचे कामकाज चालते. शिवसेनेत घटनेनुसार शिवसेना प्रमुख हे पद सर्वोच्च आहे. त्यामुळे त्यांनाच पक्षात कुणाला काढायचं याचा अधिकार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मताने सध्या उद्धव ठाकरे यांचाच निर्णय अंतिम असणार आहे. शिवसेनेत शिवसेना प्रमुखाची निवड प्रतिनिधी सभेच्या सदस्यांकडून केली जाते. या सदस्यांमध्ये आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुंबई विभाग प्रमुखांचा समावेश आहे. या प्रतिनिधी सभेच्या सदस्यांची संख्या २०१८ मध्ये २८२ जण होते. त्यांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमुख पदी निवडलं होतं.

राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड?
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील १४ सदस्यांची निवडसुद्धा प्रतिनिधी सभेकडून केली जाते. तसंच जास्ती जास्त ५ सदस्यांची निवड शिवसेना प्रमुखांना करता येते. राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांना शिवसेनेत पक्ष नेते म्हणून ओळखलं जातं. २०१८ मध्ये आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत आणि गजानन कीर्तिकर यांना पक्षनेते म्हणून निवडून दिलं होतं. यात एकनाथ शिंदे हे निवडून आले नव्हते. उद्धव ठाकरे यांनी पक्ष प्रमुख म्हणून स्वत:च्या अधिकाराअंतर्गत एकनाथ शिंदे यांच्यासह इतर ३ जणांची नियुक्ती केली. जशी नियुक्ती केली तशी ती रद्द करायचा अधिकारसुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे.

घटना बदलणंही कठीण
शिवसेनेवर ताबा मिळवायचा असेल तर एकनाथ शिंदे यांना प्रतिनिधी सभेतून निवडून यावं लागेल. सध्या यामध्ये २५० हून अधिक सदस्य असून त्यांचा पाठिंबा आवश्यक असेल. तरच एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोग मान्यता देऊन शिवसेना पक्ष असल्याचं मान्य करू शकतो. शिंदे गटाला पक्षाची घटना बदलणंही शक्य नाही. त्याचे अधिकार केवळ राष्ट्रीय कार्यकारिणीला दिले आहेत. तिथे एकनाथ शिंदे यांचे संख्याबळ कमी आहे. त्यातही शिवसेना प्रमुखांचा निर्णय अंतिम असणार आहे.