मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 29 September Live: राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय शिबीर शिर्डीत होणार - जयंत पाटील
Jayant Patil

Marathi News 29 September Live: राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय शिबीर शिर्डीत होणार - जयंत पाटील

Sep 29, 2022, 06:03 PMIST

Marathi News Live Updates: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षातील अंतर्गत विषय आणि इतर चालू घडामोडींबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओक येथे पार पडली.

Sep 29, 2022, 06:01 PMIST

NCP: शिर्डीत होणार राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर - जयंत पाटील

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षातील अंतर्गत विषय आणि इतर चालू घडामोडींबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओक येथे पार पडली. महाराष्ट्रातील विविध भागातील प्रश्न, कार्यकर्त्यांची निवेदने यावरही चर्चा झाली. येत्या ४ व ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी इथं होणाऱ्या पक्षाच्या राज्यस्तरीय शिबिरावरही चर्चा करण्यात आली. या शिबिराला राज्यातील सर्वच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

Sep 29, 2022, 05:58 PMIST

राज्यमार्ग आणि जिल्हा मार्गावरील खड्ड्यांबाबत तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

पुणे : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे अंतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर आणि सोलापुर जिल्ह्यातील विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर येणाऱ्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्र.१८००२३३१५४८ कार्यान्वित करण्यात आला आहे.  तक्रारीसाठी ही दूरध्वनी सेवा सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुरु असणार आहे. सामान्य नागरिकांना सा. बां. विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर असलेल्या खड्ड्यांबाबत काही तक्रार नोंदवायची असल्यास त्यांनी ती वरील दूरध्वनी क्रमांकावर नोंदवावी. तक्रार नोंदविताना तक्रारदाराचे नाव व दूरध्वनी क्रमांक नोंदवावा, जेणेकरुन तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीबद्दल संबंधितास कळविणे शक्य होईल.

Sep 29, 2022, 03:42 PMIST

पहिल्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'फाईव्ह टेल्स ऑफ मल्लाभूम'ची बाजी

जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित पहिल्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात 'फाईव्ह टेल्स ऑफ मल्लाभूम' या माहितीपटाने बाजी मारली. परभन्ना फाउंडेशन आणि पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात या महोत्सवाचे आयोजन केले होते.  याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, माध्यम व संज्ञापन विभागातील प्रा. विश्राम ढोले, जेट इंडिया एव्हिएशनच्या शिरीन वस्तानी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे मेघराजराजे भोसले, पर्यटन विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर, उद्योजक रोहित राठी, महोत्सवाचे प्रमुख व परभन्ना फाउंडेशनचे गणेश चप्पलवार, संयोजन समिती सदस्य मनीषा उगले, अजित शांताराम, महेश गोरे, पवन घटकांबळे आदी उपस्थित होते.

Sep 29, 2022, 02:59 PMIST

Ashok Gehlot: मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नाही : अशोक गेहलोत

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक मी लढणार नाही असं अशोक गेहलोत यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच राजस्थानमध्ये घडलेल्या घटनेबाबत त्यांनी माफीही मागितली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अशोक गेहलोत यांनी पत्रकार परिषद घेतली.

Sep 29, 2022, 01:06 PMIST

Stock Market Update: सेन्सेक्सचे अबाउट टर्न; सुरुवातीच्या तेजीनंतर आता घसरण

शेअर बाजारात सापशिडीचा खेळ सुरूच असून आज सकाळच्या सत्रात तेजीत असलेल्या सेन्सेक्स आता पुन्हा लाल निशाण फडकवलं आहे. सेन्सेक्स १५० हून अधिक अंकांनी घसरला असून निफ्टीही २५ अंकांनी घसरून ट्रेड करत आहे.

Sep 29, 2022, 12:30 PMIST

Mumbai Rain: मुंबई शहर व उपनगरात पावसाला सुरुवात

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तो खरा ठरत असून मुंबई शहर व उपनगरात पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे.

Sep 29, 2022, 10:00 AMIST

Coronavirus: मागील २४ तासांत देशात ४,२७२ नव्या करोना रुग्णांची नोंद

देशात मागील २४ तासांत ४,२७२ करोना रुग्णांची नोंद झाली आहे तर, ४,४७४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ४०,७५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोना संसर्गाचा दैनंदिन दर १.३५ टक्के इतका आहे.

Sep 29, 2022, 09:51 AMIST

PFI Twitter Account: पीएफआयचे ट्वीटर अकाऊंटही बंद

देशविघातक कारवाया केल्याप्रकरणी केंद्र सरकारनं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया व या संघटनेशी संंबंधित सर्व संस्थांवर पाच वर्षांची बंदी घातली आहे. त्यानंतर केंद्राच्या सूचनेनुसार या संघटनेचं अधिकृत ट्वीटर अकाऊंटही बंद करण्यात आलं आहे.

Sep 29, 2022, 09:45 AMIST

Stock Market: शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स उसळला

मागील काही दिवसांपासून गटांगळ्या खाणारा सेन्सेक्स आज सकाळी बाजार उघडताच उसळला. सध्या सेन्सेक्स ४९० अंकांनी वाढून ट्रेड करत आहे. तर, निफ्टी १५० अंकांनी वाढला आहे.

Sep 29, 2022, 08:27 AMIST

Ashok Gehlot: अशोक गेहलोत आज घेणार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सध्या तयारी असून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, त्याआधी राजस्थान कांग्रेसमध्ये अंतर्गत कलह दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर अशोक गेहलोत आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

Sep 29, 2022, 08:18 AMIST

Rain Update : मराठवाड्याच पावसाचा जोर वाढला, परतीच्या पावसानं नांदेडला झोडपलं!

Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं कालपासून मराठवाड्यात पुन्हा बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. कारण काल दुपारपासून औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि नांदेडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

Sep 29, 2022, 07:52 AMIST

पुढील ३ दिवस जोरदार पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसात मान्सूनने विश्रांती घेतल्यानंतर आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. येत्या तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    शेअर करा