मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 16 October 2022 Live: Raj Thackeray : लहानपणापासून मला चित्रपट निर्माता बनायचे होते; राज ठाकरे
Raj Thackeray (PTI)

Marathi News 16 October 2022 Live: Raj Thackeray : लहानपणापासून मला चित्रपट निर्माता बनायचे होते; राज ठाकरे

Oct 16, 2022, 06:57 PMIST

Marathi News Live Updates : लहानपना पासून मला चित्रपट निर्माता व्हायचे होते, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. हर हर महादेव या चित्रपटाला राज ठाकरे यांनी आवाज दिला आहे. या निमित्त त्यांची आज मुलाखत घेण्यात आली होती.

Oct 16, 2022, 06:54 PMIST

Raj Thackeray : लहानपणापासून मला चित्रपट निर्माता बनायचे होते; मनसे प्रमुख राज ठाकरे

लहानपना पासून मला चित्रपट निर्माता व्हायचे होते, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. हर हर महादेव या चित्रपटाला राज ठाकरे यांनी आवाज दिला आहे. या निमित्त त्यांची आज मुलाखत घेण्यात आली होती. यात त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या इच्छेचा उलगडा केला. मी मोठ्या प्रमाणात सीनेमा पाहत होतो. आणि त्यातून मला चित्रपट तयार करावा असे वाटायचे. मला गांधी हा चित्रपट आवडतो. मी अनेकदा हा चित्रपट पहिला आहे.

Oct 16, 2022, 06:06 PMIST

विकासकामे वेगाने मार्गी लावू; निधीची अजिबात कमतरता नाही : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : जिल्ह्यातील विकासकामे वेगाने मार्गी लावायची असून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. अधिकाधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी शासकीय निधीसोबतच उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही सहकार्य घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पालकमंत्री  पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, उप वनसंरक्षक राहुल पाटील आदी उपस्थित होते.

Oct 16, 2022, 04:56 PMIST

पुण्यात व्यावसायिकाकडून महिलेवर बलात्कार

महिलेवर बलात्कार करुन तिच्याकडून पाच लाखांची खंडणी घेतल्या प्रकरणी एका व्यावसायिकाच्या विरोधात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संजय कुंदनलाल परमार (वय ५७, रा. एकबोटे काॅलनी, अंजली अपार्टमेंट, घोरपडे पेठ) असे गु्न्हा दाखल केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. परमार यांच्या विरोधात खडक पोलिसांनी खंडणी; तसेच बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Oct 16, 2022, 02:13 PMIST

पोलिस कर्मचाऱ्याच्या माध्यमातून मला अडकवण्याचं षडयंत्र रचलं जातंय : खडसे

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या माध्यमातून खोट्या गुन्ह्याखाली मला अटक करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Oct 16, 2022, 08:06 AMIST

राज्यातील ११६५ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, थेट होणार संरपंच निवड

राज्यातील ११६५ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. १८ जिल्ह्यात ८२ तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह सरपंचपदासाठी मतदान होणार आहे. यावेळी सरपंचाची निवड थेट असल्याने निवडणूक रंगतदार होईल. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तर मतमोजणी १७ ऑक्टोबर रोजी होईल.

Oct 16, 2022, 07:55 AMIST

परतीच्या पावसाने झोडपले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; आजही पावसाची शक्यता

राज्यात अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात मुंबई, ठाणे, बीड, लातूर, औरंगाबाद, पुणे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाने झोडपलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या दोन तीन दिवसात आणखी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Oct 16, 2022, 07:25 AMIST

रशियन लष्कराच्या तळावर हल्ला, ११ सैनिकांचा मृत्यू

रशियातील बेलगरोड इथल्या लष्करी तळावर शनिवारी हल्ला झाला. यामध्ये जवळपास ११ रशियन सैनिक मृत्यूमुखी पडले आहेत तर १५ जण जखमी झाले आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार युक्रेनच्या सीमेलगत रशियन सैन्याच्या फायरिंग रेंजमध्ये दोन स्वयंसेवी सैनिकांनी इतर सैनिकांवर गोळीबार केला, त्या दोघांनाही ठार करण्यात आलं.

    शेअर करा