मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 1 September 2022 Live: महिलेला मारहाण करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यास अटक करण्याची मागणी
Raj Thackeray

Marathi News 1 September 2022 Live: महिलेला मारहाण करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यास अटक करण्याची मागणी

Sep 01, 2022, 05:37 PMIST

Marathi News Live Updates : ज्येष्ठ नागरिक महिलेला मारहाण करणार्‍या मनसे पदाधिकार्‍याला तात्काळ अटक करावी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

Sep 01, 2022, 05:36 PMIST

NCP Vs MNS: महिलेला मारहाण करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्याला तात्काळ अटक करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

ज्येष्ठ नागरिक महिलेला मारहाण करणार्‍या मनसे पदाधिकार्‍याला तात्काळ अटक करावी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. मुंबादेवी येथे गणपती डेकोरेशनचा मंडप रस्त्यात टाकणार्‍या मनसे पदाधिकार्‍याला अटकाव केल्याने चिडलेल्या मनसे पदाधिकार्‍याने एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या कानशिलात लगावली ही पुरोगामी महाराष्ट्रात दुर्दैवी आणि निषेधार्ह बाब आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

Sep 01, 2022, 05:34 PMIST

राज्यातील बाजार समितीत लासलगाव बाजार समितिने मारली बाजी; स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत पहिला क्रमांक पटकावला

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पाअंतर्गत राज्यभरातील बाजार समित्यांची त्यांच्या सन २०२१-२२ या वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील एकूण ३०५ बाजार समित्यांपैकी नाशिक जिल्ह्यातील 'लासलगाव' बाजार समितीने पहिला क्रमांक पटकाविला असून वर्धा जिल्ह्यातील 'हिंगणघाट' बाजार समितीने दुसरा तर वाशिम जिल्ह्यातील 'कारंजा (लाड)' बाजार समितीने तिसरा क्रमांक मिळवला असल्याची माहिती राज्याचे पणन संचालक  सुनिल पवार यांनी दिली आहे. राज्यामध्ये प्रथमच अशा प्रकारे बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

Sep 01, 2022, 03:07 PMIST

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Sep 01, 2022, 03:07 PMIST

Sunetra Pawar: अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार गणपती दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या घरी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. राज यांच्या नव्या घरी यंदा प्रथमच दीड दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणपती दर्शनासाठी त्यांच्या घरी नेत्यांची रीघ लागली आहे.

Sep 01, 2022, 01:08 PMIST

MNS: मनसेच्या वतीनं कोकणातील गणेशभक्तांसाठी घाटकोपर ते सावंतवाडी अशी मोफत बससेवा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घाटकोपर पश्चिम विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी घाटकोपर ते सावंतवाडी अशी मोफत बससेवा उपलब्ध करून दिली. पक्षाचे नेते श्री. बाळा नांदगावकर यांच्या हस्ते नारळ वाढवून बससेवेचा शुभारंभ झाला. याप्रसंगी सरचिटणीस रिटा गुप्ता तसंच विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष समीर सावंत यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Sep 01, 2022, 10:05 AMIST

Begampura Crime News : सापळा रचून तब्बल ११ लाखांचा गांजा जप्त; औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई

Begampura Aurangabad Crime News : औरंगाबादेतील आम्रपाली भागात शहर पोलिसांनी गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका टोळीला ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून ११ लाख ३० हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Sep 01, 2022, 09:58 AMIST

Share Market: शेअर बाजारात चढउतार सुरूच; सेन्सेक्स ५०० अंकांनी कोसळला

मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्यानं चढउतार दिसून येत आहेत. दर दिवस सेन्सेक्स हजार ते पाचशे अंकांनी वर किंवा खाली जात आहे. आजही सेन्सेक्स ५०० अंकांनी कोसळला आहे. निफ्टी १३५ अंकांनी घसरून १७६१८ वर ट्रेड करत आहे.

Sep 01, 2022, 09:45 AMIST

LPG Gas Cylinder : महिन्याच्या पहिल्याच दिवशी जनतेला मोठा दिलासा, गॅस सिलिंडरचे दर झाले कमी

LPG Gas Cylinder Price : गेल्या काही दिवसांपासून महागाईचा सामना करावा लागत असलेल्या सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आता आजपासून गॅस सिलिंडरचे दर ९२ रुपयांनी कमी झाले आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये दिल्लीत ९१.५०, मुंबईत ९२.५०, कोलकात्यात १०० रुपयांची घट झाली आहे.

Sep 01, 2022, 09:36 AMIST

Congress Protest In Umared : कॉंग्रेस आमदारानं आंदोलन करत टोलवसूली पाडली बंद!

Congress MLA Raju Devnath Parwe : नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे कॉंग्रेस आमदार राजू पारवे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह नागपूर-उमरेड मार्गावरील टोलवर आंदोलन करत टोलवसूली बंद पाडली आहे. एका खाजगी कंपनीला या टोलचं कंत्राट देण्यात आलं असून त्यात परप्रांतीय तरुणांना नोकरी दिली जात असून स्थानिक तरुणांना डावललं जात असल्याच्या आरोप कॉंग्रेस आमदार पारवेंनी केला आहे.

Sep 01, 2022, 09:30 AMIST

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ दौऱ्यावर; ३८०० कोटींच्या विकासकामांचं करणार उद्धाटन!

PM Narendra Modi Kerala Visit Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून केरळ दौऱ्यावर आहेत. आज ते श्री आदिशंकर यांच्या जन्मभूमी क्षेत्राला भेट देणार आहेत. त्यानंतर उद्या त्यांच्या हस्ते कोचीमध्ये INS विक्रांत या पहिल्या स्वदेशी विमानवाहू नौकेचं लोकार्पण केलं जाणार आहे. त्यानंतर मंगळूरूत पंतप्रधानांच्या हस्ते ३८०० कोटींच्या विकासकामांचं उद्धाटन केलं जाणार आहे.

Sep 01, 2022, 08:15 AMIST

गोसेखुर्द प्रकल्पाच्या कालव्यात दोन तरुण गेले वाहून, एकाचा मृतदेह सापडला

भंडाऱ्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात दोन तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. दोघेही नागपूरचे असून अंघोळीसाठी कालव्यात उतरल्यानंतर एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात ते वाहून गेले. दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

Sep 01, 2022, 07:41 AMIST

कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट

गणरायाच्या आगमनाला काल राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये हलका पाऊस झाला. तर औरंगाबाद, जालना, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आज कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

    शेअर करा