मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 03 December 2022 Live : स्वच्छ, सुंदर ठाण्यासाठी सर्वांनी काम करावे - एकनाथ शिंदे
Live Blog

Marathi News 03 December 2022 Live : स्वच्छ, सुंदर ठाण्यासाठी सर्वांनी काम करावे - एकनाथ शिंदे

Dec 03, 2022, 05:20 PMIST

Marathi News Live Updates : ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून स्वच्छ आणि सुंदर ठाणे साकारण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी 'माझे ठाणे' ही भावना मनात ठेवून ठाण्याच्या विकासासाठी उत्कृष्ट दर्जाचं काम करावं, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

Dec 03, 2022, 05:18 PMIST

Eknath Shinde: स्वच्छ, सुंदर ठाण्यासाठी सर्वांनी काम करावे; एकनाथ शिंदे यांचं आवाहन

ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून स्वच्छ आणि सुंदर ठाणे साकारण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी 'माझे ठाणे' ही भावना मनात ठेवून ठाण्याच्या विकासासाठी उत्कृष्ट दर्जाचं काम करावं, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ठाणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

Dec 03, 2022, 07:28 AMIST

गुजरातमधील दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला; पाच डिसेंबरला होणार मतदान

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार आज संपणार आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं असून आता पाच डिसेंबरला दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. आठ डिसेंबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.

Dec 03, 2022, 07:25 AMIST

राज्यपालांविरोधात उदयनराजे आक्रमक; आज रायगडावर करणार आंदोलन

UdayanRaje Bhosale : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भाजप खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. आज ते रायगडावर भाजपविरोधात आंदोलन करणार आहेत. शिरकाई, जगदिश्वर मंदिराला अभिवादन केल्यानंतर ते शिवभक्तांशी संवाद साधताना भूमिका स्पष्ट करणार आहेत.

    शेअर करा