मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bacchu Kadu : अधिवेशनाला अनुपस्थित राहिल्याबद्दल बच्चू कडू म्हणाले...

Bacchu Kadu : अधिवेशनाला अनुपस्थित राहिल्याबद्दल बच्चू कडू म्हणाले...

Aug 18, 2022, 11:34 AM IST

    • Bacchu Kadu on maharashtra Monsoon session पावसाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. आज मंत्री मंडळाचा दूसरा दिवस आहे. मंत्री मंडळाच्या पहिल्या दिवशी आमदार बच्चू कडू हे अनुपस्थित राहिले होते. यामुळे चर्चांना उधाण आले होते. या बाबत स्पष्टीकरण देत बच्चू कडू यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.
Bacchu Kadu

Bacchu Kadu on maharashtra Monsoon session पावसाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. आज मंत्री मंडळाचा दूसरा दिवस आहे. मंत्री मंडळाच्या पहिल्या दिवशी आमदार बच्चू कडू हे अनुपस्थित राहिले होते. यामुळे चर्चांना उधाण आले होते. या बाबत स्पष्टीकरण देत बच्चू कडू यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.

    • Bacchu Kadu on maharashtra Monsoon session पावसाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. आज मंत्री मंडळाचा दूसरा दिवस आहे. मंत्री मंडळाच्या पहिल्या दिवशी आमदार बच्चू कडू हे अनुपस्थित राहिले होते. यामुळे चर्चांना उधाण आले होते. या बाबत स्पष्टीकरण देत बच्चू कडू यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.

Bacchu Kadu on Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन केल्यावर ४१ दिवसांनी मंत्री मंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळाच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. विरोधकांनी पहिल्या दिवशी सभागृहाबाहेर निदर्शने केली होती. यामुळे हे अधिवेशन हे वादळी ठरणार आहे हे स्पष्ट झाले आहे. शिंदे सरकारच्या मंत्री मंडळाच्या विस्तारत स्थान न मिळाल्याने आमदार बच्चू कडू हे नाराज आहेत. यामुळे ते अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात अनुपस्थित राहिले. यामुळे चर्चांना उधाण आले होते. मात्र, मात्र बच्चू कडू यांनी विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची बाजू स्पष्ट केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

Kolhapur News : धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

Supriya Sule : आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

Maharashtra Weather Update:विदर्भ तापला! बहुतांश जिल्ह्यात पारा ४३ पार; अकोला, वर्धा, नागपूरला हीट वेव्ह व पावसाचा इशारा

मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने बच्चू कडू हे नाराज आहेत. यावर त्यांनी या पूर्वीही त्यांची प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवस्थानी जाऊन भेट घेत नाराजी जाहीर केली होती. यावेळी त्यांनी नाराज असल्याचे सांगत दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारत स्थान मिळेल अशी आशा व्यक्ति केली होती. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते अनुपस्थित राहिल्याने पुन्हा त्यांची त्यांची नाराजी उघड झाली होती. दरम्यान आज ते सभागृहात आल्यावर त्यांनी मध्यमांशी संवाद साधला.

बच्चू कडू म्हणाले, मी कामानिमित्त बाहेर असल्याने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहू शकलो नाही. मी नाराज आहे म्हणून न येण्याचं काही कारण नाही. नाराजी असली तरी ती सभागृहात दाखवण्यात अर्थ नाही. कडू म्हणाले, मी याआधीही बोललो आहे की, व्यक्तिगत हितासाठी मी नाराज होणार नाही. महत्त्वाचे मुद्दे असून त्यासंबंधी लढा सुरु राहील. १५ सप्टेंबरच्या आत मंत्रीमंडळ विस्तार होईल. या विस्तारात मुख्यमंत्री आपला शब्द पाळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.भापजच्या केंद्रीय कार्यकरणी बद्दल बच्चू कडू म्हणाले, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. फडणवीस आणि गडकरी यांना वेगळं करुन चालणार नाही. सिंचन घोटाळ्याबद्दल कडू म्हणाले, ईडीचा उपयोग देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी केला आणि तो सार्वत्रिक केला तर चांगलं होईल.