मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Live News Updates 28 January 2023 : माहीममध्ये इमारतीत भीषण आग, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल
Live Blog

Live News Updates 28 January 2023 : माहीममध्ये इमारतीत भीषण आग, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

Jan 28, 2023, 11:48 PMIST

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. भाजपने अद्याप सत्यजित तांबे यांना थेट पाठींबा दिलेला नाही. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Jan 28, 2023, 11:48 PMIST

माहीममध्ये इमारतीत अग्निकांड, खिडक्यांमधून आग व धुराचे लोळ 

माहिमधील सेनापती बापट मार्गावर मारीनगर येथील नित्यछाया अपार्टमेंटला आग लागली. ही आग तळमजला व वरील तीन मजल्यावर पसरली. खिडकीतून आगीचे लोळ बाहेर पडत होते. मुंबई महापालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

Jan 28, 2023, 05:55 AMIST

गृहमंत्री अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

गृहमंत्री अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. अमित शहा कर्नाटकातील हुबळी, धारवाड, बेळगावमधील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

Jan 28, 2023, 05:54 AMIST

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानच्या भीलवाडा येथील भगवान देवनारायणाच्या ११११  व्या अवतरण महोत्सवात सहभागी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानच्या भीलवाडा येथील भगवान देवनारायणाच्या ११११  व्या अवतरण महोत्सवात सहभागी होणार आहेत.  

Jan 28, 2023, 05:53 AMIST

NItin Gadakari : नितीन गडकरी यांचा आज कोल्हापूर दौरा 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी ते अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते करवीर पिठाच्या शंकराचार्य मठाला भेट देणार आहेत.

Jan 28, 2023, 05:52 AMIST

Sharad Pawar : शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

Jan 28, 2023, 05:51 AMIST

Vidhan Parishad Election :  विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. भाजपने अद्याप सत्यजित तांबे यांना थेट पाठींबा दिलेला नाही. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

    शेअर करा