मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Live News Updates 23 January 2023: शरद पवारांशी माझं जुनं भांडण - प्रकाश आंबेडकर
Sharad Pawar - Prakash Ambedkar

Live News Updates 23 January 2023: शरद पवारांशी माझं जुनं भांडण - प्रकाश आंबेडकर

Jan 23, 2023, 01:41 PMIST

Shiv Sena - Vanchit Bahujan Aghadi : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे. वंचित व शिवसेनेच्या युतीची घोषणा शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केली.

Jan 23, 2023, 01:24 PMIST

Uddhav Thackeray : ही युती अचानक झालेली नाही. सर्वांशी चर्चा झाली आहे - उद्धव ठाकरे

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती ही एका रात्रीत झालेली नाही. आम्हाला काल वाटलं आणि आज घोषणा केली असं झालेलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशीही चर्चा झालेली आहे. महाविकास आघाडीतील पक्षांचाही यावर आक्षेप असेल असं वाटत नाही - उद्धव ठाकरे

Jan 23, 2023, 01:21 PMIST

Prakash Ambedkar : शरद पवार यांच्याशी माझं जुनं भांडण - प्रकाश आंबेडकर

शरद पवार आणि माझं भांडण जुनं आहे. शेतातलं भांडण नाही. नेतृत्वाचं आणि दिशेचं भांडण आहे. ते आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा करतो - प्रकाश आंबेडकर

Jan 23, 2023, 01:19 PMIST

Prakash Ambedkar : देशात लुटारू आणि भांडवलशहांची सत्ता - प्रकाश आंबेडकर

देशात सध्या लुटारू आणि भांडवलशाहीची सत्ता आहे. सत्ताधारी गरिबांचं राजकारण करताना दिसत नाहीत. ईडीच्या माध्यमातून राजकीय नेतृत्व संपवली जातायत. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. निवडणुका जिंकून द्यायच्या की नाही हे जनतेच्या हातात असतं. आम्ही एका वेगळ्या विचारानं एकत्र आलो आहेत - प्रकाश आंबेडकर

Jan 23, 2023, 01:11 PMIST

Uddhav Thackeray  :  देशातील वैचारिक व राजकीय प्रदूषणाविरोधात आम्ही एकत्र येतोय - उद्धव ठाकरे

आमच्या आजोबांनी चुकीच्या प्रथा-परंपरा व रुढींविरोधात उठाव केला. आम्ही आता सध्याच्या राजकीय व वैचारिक प्रदूषणाविरोधात एकत्र येत आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा करताना सांगितलं.

Jan 23, 2023, 01:14 PMIST

Shiv Sena -Vanchit Bahujan Aghadi : शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे. वंचित व शिवसेनेच्या युतीची घोषणा शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केली.

Jan 23, 2023, 12:53 PMIST

Share Market Updates : शेअर बाजारात तेजी कायम, सेन्सेक्स वधारला

नव्या वर्षाची सुरुवात झाल्यापासून अपवाद वगळता शेअर बाजारात तेजी कायम असून आजही सेन्सेक्स २५० हून अधिक अंकांनी वधारला आहे. निफ्ठी ७५ अंकांनी वाढून ट्रेड करत आहे. तर, बँक निफ्टीही जोरात आहे.

Jan 23, 2023, 12:52 PMIST

Journalist Vijay Bhosale Demise : पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे निधन

पिंपरी चिंचवड शहरातील दै. केसरीचे सर्वात जेष्ठ, आणि गेली २५ वर्षापेक्षा अधिक काळ विधिमंडळ वार्तांकन करणारे पत्रकार विजय भोसले (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दोनच दिवसांपूरर्वी भोसरी येथील एका खासगी हॉस्पिटलचे उद्घाटन कार्यक्रमात त्यांना भोवळ आली म्हणून वायसीएम मध्ये दाखल केले होते. मूळचे सातार जिल्ह्यातील औंध येथील रहिवासी असलेले भोसले हे गेली ४० वर्षे पत्रकारितेच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झाले होते. अत्यंत अभ्यासपूर्ण, आक्रमक, मुद्देसूद लिखाण शैली असल्याने त्यांची राजकारणात एक जरब होती.

Jan 23, 2023, 12:36 PMIST

Pune Bypoll :  कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराचे नाव थोड्या दिवसात दिल्लीमधून जाहीर होणार :  चंद्रकांत पाटील

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराचे नाव थोड्या दिवसात दिल्लीमधून जाहीर होणार असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यांनी या निवडणुकी संदर्भात त्यांच्या निवस्थानी बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना वरील माहिती दिली. 

Jan 23, 2023, 12:53 PMIST

एअर इंडियातर्फे देशांतर्गत प्रवासावर आकर्षक सूट 

एअर इंडियाने एक आकर्षक उपक्रम सुरू केला आहे. भारताच्या ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एअर इंडियाच्या संपूर्ण देशांतर्गत नेटवर्कमध्ये आकर्षक सूट दिली जात आहे.  २१ जानेवारी ते २३ जानेवारी २०२३ पर्यंत सुरु राहील. एअर इंडियाच्या सर्व बुकिंग प्लॅटफॉर्म्सवर तसेच एअर इंडियाच्या अधिकृत ट्रॅव्हल एजंट्सकडे देखील या सेलचा लाभ घेता येईल. डिस्काउंटेड तिकिटे इकॉनॉमी क्लासमध्ये उपलब्ध असतील आणि १ फेब्रुवारी ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत भारतामध्ये संपूर्ण देशांतर्गत नेटवर्कमध्ये प्रवासासाठी लागू असतील. अंदाजे १७०५ रुपयांच्या अतिशय कमी वन-वे शुल्कापासून तब्बल ४९ पेक्षा जास्त देशांतर्गत ठिकाणच्या तिकिटांवर सूट दिली जात आहे. कुटुंबासोबत सुट्टीवर जाणे असो किंवा कामासाठी प्रवास करणे असो, एअर इंडियाच्या विशाल देशांतर्गत नेटवर्कमध्ये आकर्षक सूट योजनेचा लाभ मिळवता येईल.

Jan 23, 2023, 11:24 AMIST

३०० विद्यार्थी साकारणार "कॉफी पेंटिग ऑफ बाळासाहेब ठाकरे"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घराघरात बाळासाहेब ठाकरे-मनामनात बाळासाहेब ठाकरे हा संकल्प घेऊन हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त बाळासाहेबांची शिवसेना स्वा. सावरकर नगर, ठाणे.आयोजित, सोमवार दि.२३ जानेवारी २०२३ रोजी.सकाळी ९ ते ११ वाजे पर्यंत.स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान स्वा सावरकर नगर उद्यानात ४ थी ते ७ वी मधील ३०० विदयार्थी एकाच वेळी साकारणार हिंदुहृदयसम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे "कॉफी पेंटिग ऑफ बाळासाहेब ठाकरे" चित्रारांजली' स्वरूपात आपले प्रेम, आदर, श्रद्धा; त्यांना अर्पण करणार आहेत.उद्घाटक प्रसिद्ध चित्रकार डग्लस जॉन असून विशेष उपस्थिती सिने नाट्य कलाकार दिपकार पारकर असणार आहेत. याचे आयोजन गटनेते, मा. नगरसेवक.दिलीप बारटक्के शाखाप्रमुख हितेंद्र लोटलीकर यांनी केले आहे.

Jan 23, 2023, 10:34 AMIST

Pakistan : पाकिस्तानात बत्ती गुल्ल ! अनेक शहरे अंधारात

भिकेला लागलेल्या पाकिस्तानमध्ये आता विजेची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये गेल्या २४ तासाहून अधिक काल बत्ती गुल्ल झाली आहे. लाइट नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

Jan 23, 2023, 10:31 AMIST

Kasaba Bypoll : कसबा पोट निवडणुकबात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलावली बैठक

Kasaba Bypoll : कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. सकाळी ११ वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी ही हो बैठक होणार आहे.

Jan 23, 2023, 09:18 AMIST

MNS on BMC Scam : संदीप देशपांडे आज मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देणार

करोना काळात मुंबई महापालिकेनं दिलेल्या विविध कंत्राटांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप मनसेनं केला असून मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे आज पुराव्यासह हा भ्रष्टाचार पत्रकार परिषदेत मांडणार आहेत. सकाळी ११ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देशपांडे यांनी केलेले आरोप पाहता त्यांचा निशाणा शिवसेनेवर, विशेषत: आदित्य ठाकरे यांच्यावर असण्याची शक्यता आहे. 

Jan 23, 2023, 09:37 AMIST

Ins vagir : 'आयएनएस वागीर' भारतीय नौदलात दाखल

सायलेंट किलर म्हणून ओळख प्राप्त असेलली प्रोजेक्ट -75 ची फ्रेंच स्कॉर्पियन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली 'आयएनएस वागीर' ही पाणबुडी आज भारतीय नौदलात दाखल होत आहे.  

Jan 23, 2023, 09:35 AMIST

rashtriya bal puraskar : राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रीय बाल पुरस्कार, बीडच्या रोहन बहिरचा समावेश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात ११  मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  एक लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

Jan 23, 2023, 09:37 AMIST

Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, विधान भवनात तैलचित्राचे अनावरण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्या निमित्ताने त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळी ठाकरे आणि शिंदे गटातील नेते दिवसभरात येऊन अभिवादन करताना पाहायला मिळतील. आज विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे.

Jan 23, 2023, 05:42 AMIST

Shivsena : उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदाची मुदत आज संपुष्टात; निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष

Shivsena : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत आज सोमवारी संपणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात सध्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाचा वाद सूर आहे. अद्याप या बाबत निर्णय झालेल्या नाही. हा निर्णय आल्यावर पुढील रणनीती ठरवणार असल्याची माहिती शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.

    शेअर करा