मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  GST Racket: मुंबईत जीएसटी रॅकेट उघडकीस, ४१ कोटींची बनावट बिले

GST Racket: मुंबईत जीएसटी रॅकेट उघडकीस, ४१ कोटींची बनावट बिले

Aug 19, 2022, 12:02 PM IST

    • सीजीएसटीच्या पथकाला तपासात ४१ कोटी रुपयांच्या खोट्या बिलांच्या आधारे १८ कोटींच्या आयटीसीचा लाभ घेतल्याची माहिती मिळाली आहे.
crime news (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

सीजीएसटीच्या पथकाला तपासात ४१ कोटी रुपयांच्या खोट्या बिलांच्या आधारे १८ कोटींच्या आयटीसीचा लाभ घेतल्याची माहिती मिळाली आहे.

    • सीजीएसटीच्या पथकाला तपासात ४१ कोटी रुपयांच्या खोट्या बिलांच्या आधारे १८ कोटींच्या आयटीसीचा लाभ घेतल्याची माहिती मिळाली आहे.

GST Racket: सीजीएसटीच्या मुंबईतील भिवंडी आयुक्तालयाच्या पथकाने आयटीसीसाठी खोटी बिले दाखवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सध्या याप्रकरणी ४१ कोटी रुपयांच्या खोट्या बिलांच्या आधारे १८ कोटींच्या आयटीसीचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एका कंपनीतील एकास अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

Mumbai Local Fatka Gang: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

याबाबत सीजीएसटी भिवंडीचे आयुक्त सुमित कुमार यांनी सांगितले की, बनावट पावत्यांच्या माध्यमातून टॅक्स क्रेडीटचा फायदा घेणारं हे रॅकेट होतं. या रॅकेटशी संबंधित एका कंपनीने १४.३० कोटी रुपयांच्या बनावट बिलांच्या माध्यमातून २.५७ कोटी रुपये आयटीसीचा फायदा घेतला. हे प्रकरण उघडकीस येताच कंपनीच्या मालकाला अटक केली आहे.

सीजीएसटीच्या पथकाने ज्या कंपनीच्या मालकाला अटक केलीय त्या कंपनीचे नाव विश्वकर्मा एंटरप्रायजेस असं आहे. त्यांनी १४.३० कोटी रुपयांच्या खोट्या पावत्या दाखवून २.५७ कोटी रुपयांच्या आयटीसीचा फायदा घेतला. आरोपीला सीजीएसटी कायदा २०१७ च्या कलम ६९ आणि कलम १३२ अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. भिंवडीच्या सीजीएसटी आयुक्तांनी जामिनावर त्याची सुटका केली आहे.

कर चुकवेगिरी आणि फसवणूक करणारे तसंच बनावट आयटीसी रॅकेटविरोधा सीजीएशटी मुंबई विभागाने विशेष मोहिम उघडली आहे. गेल्या वर्षभरात सीजीएसटी भिवंडीकडून करण्यात आलेली ही १५ अटक आहे. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा