मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Govinda Death In Dapoli : दहीहंडीत नाचताना गोविंदाचा मृत्यू; रत्नागिरीत शोककळा!

Govinda Death In Dapoli : दहीहंडीत नाचताना गोविंदाचा मृत्यू; रत्नागिरीत शोककळा!

Aug 20, 2022, 10:11 AM IST

    • Govinda Death In Dapoli Ratnagiri : राज्यभरात काल श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला, परंतु आता दापोलीत नाचत असताना एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Govinda Death In Dapoli (HT)

Govinda Death In Dapoli Ratnagiri : राज्यभरात काल श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला, परंतु आता दापोलीत नाचत असताना एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

    • Govinda Death In Dapoli Ratnagiri : राज्यभरात काल श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला, परंतु आता दापोलीत नाचत असताना एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Govinda Death In Dapoli Ratnagiri : मुंबई आणि पुण्यासह राज्यातील विविध भागांमध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला असून आता रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत दहीहंडीत नाचत असताना एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळं आता ऐन उत्सवातच एका गोविंदाचा मृत्यू झाल्यानं रत्नागिरी जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nagpur Accident: भरधाव कार झाडावर आदळून नदीत बुडाली, बाप-लेकाचा मृत्यू; नागपूर येथील घटना

Navi Mumbai: प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून मुलीचे अश्लील फोटो केले व्हायरल; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फोन, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Hospital Fire: मुंबईच्या कांदिवली येथील खासगी रुग्णालयाला आग, ४ जण होरपळले

मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातल्या हर्णे पाजपंढरी गावात दरवर्षी दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गेल्या तीन वर्षांपासून राज्यात कोरोना महामारीमुळं दहीहंडी साजरी करण्यात आलेली नव्हती. त्यानंतर हर्णे पाजपंढरी गावात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात नाचत असताना वसंत लाया चौगले या गोविंदाचा मृत्यू झाला आहे.

नेमकं काय झालं?

कोरोना महामारीनंतर गावात पहिल्यांदाच निर्बंधमुक्त आणि नियमुक्त दहीहंडी साजरी केला जात असल्यानं वसंत चौगुले हे दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. यावेळी उत्सवात गाणी सुरू असताना ते नाचायला लागले, परंतु त्यांच्या छातीत अचानक कळ यायला लागल्यानं ते खाली पडले, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं लक्षात येताच उपस्थितांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता.

पाजपंढरीतील या घटनेमुळं गावाच्या पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दहीहंडी उत्सवात वसंत चौगले यांचा मृत्यू झाल्याची बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळं ऐन उत्सवातच दापोली तालुक्यावर दुखाचं सावट पसरलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा