मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Honey Trap: पुण्यातील DRDO संस्थेतून पाकिस्तानला पुरवली गुप्त संरक्षण माहिती; संचालकाला अटक

Honey Trap: पुण्यातील DRDO संस्थेतून पाकिस्तानला पुरवली गुप्त संरक्षण माहिती; संचालकाला अटक

May 04, 2023, 10:33 PM IST

  • Director of Pune's DRDO arrested: पुणेस्थित डॉ. प्रदीप कुरूलकर हे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करणाऱ्या गुप्तहेराच्या संपर्कात होता आणि त्याच्याकडून भारताच्या संरक्षण क्षेत्राबद्दल माहिती पुरवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो.

Dr Pradeep Kurulkar, Director of Pune based DRDO organisation arrested in connection with a honey trap from Pakistan spy

Director of Pune's DRDO arrested: पुणेस्थित डॉ. प्रदीप कुरूलकर हे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करणाऱ्या गुप्तहेराच्या संपर्कात होता आणि त्याच्याकडून भारताच्या संरक्षण क्षेत्राबद्दल माहिती पुरवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो.

  • Director of Pune's DRDO arrested: पुणेस्थित डॉ. प्रदीप कुरूलकर हे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करणाऱ्या गुप्तहेराच्या संपर्कात होता आणि त्याच्याकडून भारताच्या संरक्षण क्षेत्राबद्दल माहिती पुरवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो.

पुण्यातील प्रसिद्ध डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (DRDO) या संरक्षण क्षेत्रातील महत्वाच्या अशा सरकारी संस्थेत संचालक म्हणून कार्यरत डॉ. प्रदीप कुरूलकर यांना आज दहशतवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली. पुणेस्थित हा संचालक एका पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करणाऱ्या गुप्तहेराच्या संपर्कात होता आणि त्याच्याकडून भारताच्या संरक्षण क्षेत्राबद्दल माहिती पुरवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. हे ‘हनी ट्रॅप’चे प्रकरण असल्याचे सांगितले जाते. 

ट्रेंडिंग न्यूज

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

Mumbai Fire: मुंबईच्या अंधेरीत गॅस पाइपलाइन लिकेज झाल्याने आग, ४ जण होरपळले; रुग्णालयात उपचार सुरू

Sunday Mega Block 05 May 2024: मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; कुठून किती वाजता सुटणार लोकल? वाचा

Lok Sabha Elections 2024: काँग्रेसला धक्का! संजय निरुपम यांचा पत्नी आणि मुलीसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

डॉ. प्रदीप कुरूलकर असे या डीआरडीओच्या संचालकांचे नाव असून त्यांच्या निवृत्तीला अवघे सहा महिने उरले होते, अशी माहिती आहे. पुण्यात पाषाण परिसरात डीआरडीओ ही संस्था असून येथे संरक्षण क्षेत्राशी संबंधित संशोधनाचे काम होत असते. डॉ. कुरूलकर हे हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानी गुप्तचरांसोबत गेले काही महिने संपर्कात होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. डॉ. कुरूलकरांनी व्हाट्सअप मॅसेज आणि व्हाट्सअप चॅटच्या माध्यमातून त्यांनी संरक्षण क्षेत्रासंबंधी संवेदनशील माहिती पाकिस्तानी इंटेलिजन्स ॲाफिसरला दिल्याचं स्पष्ट झालं आहे. मोबाईलच्या माध्यमातून ते गेले सहा महिने पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या महिलेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. या कारणामुळे एटीएसने कुरूलकर यांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.