मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतण्याला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतण्याला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Aug 09, 2022, 09:18 AM IST

    • Eknath Shinde nephew arrested: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे याच्यासह १० जणांना  गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
क्राइम न्यूज (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Eknath Shinde nephew arrested: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे याच्यासह १० जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

    • Eknath Shinde nephew arrested: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे याच्यासह १० जणांना  गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे. दैनिक सामनाने याबाबत वृत्त दिलं असून त्यात म्हटलंय की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुतणे महेश शिंदे यांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महेश शिंदे याच्यावर अटकेची कारवाई केली. आधी त्याला चौकशी करून सोडून देण्यात आलं होतं. मात्र या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर त्याला रात्री उशिरा पुन्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर अटक करण्यात आली आहे. महेश शिंदे यांच्यासह १० जणांना अटक केली असल्याची माहिती समजते. एका क्लबमध्ये हे सर्वजण जुगार खेळत होते. तसंच संबंधित रूम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्या महेश शिंदे याच्या नावे बूक केली होती.

ट्रेंडिंग न्यूज

Nagpur Accident: भरधाव कार झाडावर आदळून नदीत बुडाली, बाप-लेकाचा मृत्यू; नागपूर येथील घटना

Navi Mumbai: प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून मुलीचे अश्लील फोटो केले व्हायरल; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फोन, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Hospital Fire: मुंबईच्या कांदिवली येथील खासगी रुग्णालयाला आग, ४ जण होरपळले

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मीरा-भाइंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेनं महेश शिंदे यांना शुक्रवारी अटक केली. महेश शिंदे हे इतर १० जणांसोबत मीरारोड इथल्या सीजीजी क्लब हॉटेलमध्ये जुगार खेळताना सापडले होते. जुगार खेळाबाबतची माहिती मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिस निरीक्षक अविराज कुऱ्हाडे यांनी छापा टाकून बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतण्याचा या जुगार खेळात सहभाग असल्याचं आढळल्यानं चर्चा सुरू झाली होती. जीसीसी क्लब हॉटेलच्या ७९४ नंबर रुममध्ये १० जण जुगार खेळत होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करताना महेश शिंदे यांच्यासह १० जणांना ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर त्यांना सोडूनही देण्यात आलं होतं. मात्र प्रकरणाची चर्चा जास्त व्हायला लागल्यानं त्यांना रात्री पुन्हा एकदा अटक करण्यात आली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा