मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Water Supply : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी.. ३१ मार्चपासून ३० दिवस १५ टक्के पाणीकपात

Mumbai Water Supply : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी.. ३१ मार्चपासून ३० दिवस १५ टक्के पाणीकपात

Mar 28, 2023, 11:46 PM IST

  • Mumbai Water Supply news : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दिनांक ३१ मार्च २०२३ पासून पुढील ३० दिवस १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

संग्रहित छायाचित्र

Mumbai Water Supply news : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दिनांक ३१ मार्च २०२३ पासून पुढील ३० दिवस १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

  • Mumbai Water Supply news : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दिनांक ३१ मार्च २०२३ पासून पुढील ३० दिवस १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

Mumbai Water Cut : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दिनांक ३१ मार्च २०२३ पासून पुढील ३० दिवस १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना महिनाभर पाणी जपून वापरावे लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे ही पाणीकपात लागू करण्यात आली असल्याचे मुंबई महापालिकेने सांगितले आहे. ही पाणीकपात मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्याला लागू असणार असल्याची माहितीही मुंबई महापालिकेने दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

परभणीत ऑनर किलिंग..! प्रेम विवाहाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीचा केला ‘सैराट’ अंत

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत आहे. ही गळती दुरुस्त करण्याचे काम शुक्रवार दिनांक ३१ मार्च २०२३ पासून सुरु करण्यात येणार आहे. या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे पाणी गळती होत आहे. ही गळती दुरुस्त करण्याचे काम शुक्रवार दिनांक ३१ मार्च २०२३ पासून सुरु करण्यात येणार आहे. या कामामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दिनांक ३१ मार्च २०२३ पासून पुढील ३० दिवस १५ टक्के पाणी कपात लागू राहणार आहे

मुंबई शहर व उपनगराच्‍या एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे ६५ टक्‍के पाणीपुरवठा हा भांडुप संकूल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. या केंद्रास होणारा ७५ टक्‍के पाणीपुरवठा मुख्‍यत्‍वे ५५०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या १५ किलोमीटर लांबीच्‍या जलबोगद्याद्वारे होतो. या जल बोगद्यास ठाणे येथे कूप‍नलिकेच्‍या खोदकामामुळे हानी पोहचली. या हानीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे.

 

त्यामुळे ही पाणी गळती थांबवण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पर्जन्य जलवाहिनीसाठी बॉक्स कर्ल्व्हटचे काम सुरू असताना मुलुंड जकात नाका परिसरातील पालिकेच्या २ हजार ३४५ मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीस हानी पोहोचली आहे. त्यातून गळती होऊ लागल्याने पिसे-पांजरापूर संकुलातून पाणी वाहून आणणाऱ्या या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.  त्यामुळे सोमवारपासून दोन दिवस काही भागात पाणी कपात केली जात आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा