मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer : उन्हाळ्यात नारळ पाणी पिणं ठरतंय आरोग्यासाठी गुणकारी, वाचा फायदे

Summer : उन्हाळ्यात नारळ पाणी पिणं ठरतंय आरोग्यासाठी गुणकारी, वाचा फायदे

May 21, 2022, 09:14 AM IST

    • Coconut Water In Summer : अनेक लोकांना नारळपाणी पिणं आवडतं. उन्हाळ्यात वाढलेल्या उष्णतेपासून शरीराला गारवा मिळवण्यासाठीदेखील काहीजण नारळपाण्याचं सेवन करत असतात.
Benefits Drinking Coconut Water In Summer (HT)

Coconut Water In Summer : अनेक लोकांना नारळपाणी पिणं आवडतं. उन्हाळ्यात वाढलेल्या उष्णतेपासून शरीराला गारवा मिळवण्यासाठीदेखील काहीजण नारळपाण्याचं सेवन करत असतात.

    • Coconut Water In Summer : अनेक लोकांना नारळपाणी पिणं आवडतं. उन्हाळ्यात वाढलेल्या उष्णतेपासून शरीराला गारवा मिळवण्यासाठीदेखील काहीजण नारळपाण्याचं सेवन करत असतात.

Benefits Drinking Coconut Water In Summer : गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह देशभरात वाढलेल्या उष्णतेमुळं लोक हैराण झालेले आहेत. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोक थंड पदार्थ खाणं किंवा घरात एसीचा वापर करायला प्राधान्य देत आहेत. परंतु वाढलेल्या उष्णतेच्या वातावरणात शरीराला हायड्रेट ठेवण्याची सर्वात जास्त आवश्यकता असते. त्यासाठी अनेकजण हे फळं आणि ज्यूस घेणं पसंत करतात. त्यामुळं शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. असेही काही लोक आहेत की ज्यांना उन्हाळ्यात नारळाचं पाणी पिणं फार आवडतं. उन्हाळ्यात नारळ पाणी पिणं आपल्या आरोग्यासाठीही प्रचंड फायदेशीर असल्याचं मानलं जातं. त्यामुळं नारळ पाण्याचे काय गुणकारी फायदे आहेत, जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

World Thalassemia Day 2024: का साजरा केला जातो जागतिक थॅलेसेमिया दिन? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि यंदाची थीम

Mother's Day 2024: या धार्मिक स्थळांवर तुमच्या आईसोबत साजरा करा मदर्स डे, नेहमी लक्षात राहील हा दिवस

World Asthma Day 2024: दम्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Aam Pora Recipe: चवीला अप्रतिम लागते बंगाल स्टाईल आम पोरा, सर्वांना आवडेल ही रेसिपी

वाढलेल्या उन्हात नारळाचं पाणी पिल्यास त्यामुळं उष्णतेपासून दिलासा मिळतो. कारण नारळ पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम आदींसारखे महत्त्वाचे पोषकतत्व असतात. याशिवाय त्यात ९४ टक्के पाणी आणि फॅटचं प्रमाण हे फार कमी असल्यानं ते आरोग्यासाठी गुणकारी ठरतं.

नारळ पाणी पिण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे?

वातावरणातील वाढलेल्या उष्णतेमुळं शरीरातील ऊर्जेची पातळी वाढण्यास मदत होते. याशिवाय नारळाचं पाणी पिल्यानं व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.

मधुमेहावर मात करण्यासाठी गुणकारी...

नारळाचं पाणी पिल्यामुळं शरीरातील साखरेचं प्रमाण हे संतुलित राहण्यास मदत होत असते. त्यामुळं मधुमेहाच्या आजारानं त्रस्त असलेल्या लोकांना नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

मूत्रपिंडांसाठीही फायदेशीर...

नारळपाण्याचं सेवन करणं हे किडनीच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानलं जातं. कारण त्यामुळं किडनीतील दगडांचे स्फटिक कमी होण्यास मदत होत असते. याशिवाय याच्या सेवनामुळं किडनी स्टोन लघवीद्वारेदेखील बाहेर पडण्याची शक्यता असते.

चेहरा आणि त्वचेसाठीही फायदेशीर...

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवलं तरच तुमची त्वचा सुधारते. याशिवाय चेहऱ्यावर ग्लो यायला लागतो. याशिवाय नारळपाण्याचं सेवन केल्यास त्यामुळं चेहऱ्यावरील मुरुम आणि मुरुमांपासून सुटका मिळते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)