मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diabetes Care: मधुमेह आजराचे वाढत आहे प्रमाण, जाणून घ्या लक्षणं, प्रकार आणि उपचार!

Diabetes Care: मधुमेह आजराचे वाढत आहे प्रमाण, जाणून घ्या लक्षणं, प्रकार आणि उपचार!

Apr 26, 2024, 01:39 PM IST

    • Diabetes Symptoms: जगातील मधुमेहाच्या एकूण रुग्णांपैकी १७% रूग्ण भारतात आढळतात. त्यामुळे या आजराकडे नीट लक्ष देणे गरजेचे आहे.
Diabetes Care Tips (freepik )

Diabetes Symptoms: जगातील मधुमेहाच्या एकूण रुग्णांपैकी १७% रूग्ण भारतात आढळतात. त्यामुळे या आजराकडे नीट लक्ष देणे गरजेचे आहे.

    • Diabetes Symptoms: जगातील मधुमेहाच्या एकूण रुग्णांपैकी १७% रूग्ण भारतात आढळतात. त्यामुळे या आजराकडे नीट लक्ष देणे गरजेचे आहे.

Health Care: मधुमेह ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे जी रक्तातील साखरेच्या वाढीव पातळीमुळे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी संभाव्य धोके निर्माण करते. जेव्हा स्वादुपिंड अपुऱ्या प्रमाणात इन्सुलिन तयार करते किंवा जेव्हा शरीराच्या पेशी इन्सुलिनच्या परिणामांना प्रभावीपणे प्रतिसाद देत नाहीत तेव्हा ही परिस्थिती उद्भवते. मधुमेह ही आरोग्याची एक गंभीर स्थिती असल्यामुळे हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार आणि दृष्टी कमी होणे यांसारखे दुष्परिणाम संभवतात. जगातील मधुमेहाच्या एकूण रुग्णांपैकी १७% रूग्ण भारतात आढळत असल्याने आपल्या देशाला 'मधुमेहाची राजधानी' अशी निराशाजनक ओळख प्राप्त झाली आहे. जवळपास ८० कोटी भारतीयांना मधुमेह आहे. भारतातील वाढत्या मधुमेहाचा संबंध प्रामुख्याने जीवनशैलीतील बदलांशी आहे. आहाराच्या सवयींमध्ये झपाट्याने होणारे बदल, बैठी जीवनशैली आणि शरीराचे वजन वाढणे हे शहरी आणि निमशहरी भागात मधुमेहाचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरणारे प्राथमिक घटक आहेत. याबद्दल हार्मोन क्लिनिक आणि बुकान डायबेटिक सेंटरचे मधुमेहतज्ज्ञ, थायरॉइड तज्ज्ञ, एन्डोक्रिनोलॉजिस्ट डॉ. अमोल बुकान यांच्याकडून जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

joke of the day : पोलीस जेव्हा एका महत्त्वाच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी बंड्याच्या घरी जातात…

Yoga Mantra: हेअर फॉलच्या समस्येपासून आराम देऊ शकतात ही योगासनं, ही आहे करण्याची योग्य पद्धत

Travel in May: मे महिन्यात फिरण्यासाठी बेस्ट आहेत ही ठिकाणं, तुमची सुट्टी होईल संस्मरणीय

Mother's Day Recipe: आईसाठी बनवा टेस्टी ड्राय केक, अंड्याशिवायही बनेल सॉफ्ट आणि स्पॉन्जी

आहे दोन प्रकार

मधुमेहाचे विविध प्रकार आहेत ज्यात 'टाइप २' मधुमेह हा सर्वात सामान्य प्रकार आहे. यात इन्सुलिने उत्पादन अपुऱ्या प्रमाणात होते किंवा शरीरातील पेशी पुरेशा प्रमाणात प्रतिसाद देत नाहीत. या स्थितीला इन्सुलिन प्रतिरोध असे म्हणतात. 'टाइप १' मधुमेह हा एक असा स्वयंप्रतिकार विकार आहे ज्यामध्ये रोगप्रतिकारक यंत्रणा स्वादुपिंडातील इन्सुलिन उत्पादक पेशींना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करते आणि काढून टाकते. 'प्रीडायबेटीस' (मधुमेहपूर्व) अशीही एक स्थिती असते जी टाइप २ मधुमेहाच्या प्राथमिक अवस्थेचे संकेत देते. या स्थितीत रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढलेली असते; परंतु टाइप २ मधुमेहाचे अधिकृत निदान होण्याइतपत ती वाढत नाही. याशिवाय 'गर्भावस्थेतील मधुमेह' हाही एक प्रकार आहे जो गर्भधारणेदरम्यान उद्भवतो आणि सामान्यत: बाळाच्या जन्मानंतर नाहीसा होतो. ज्या महिलांमध्ये गर्भावस्थेतील मधुमेह उद्भवतो त्यांना भावी आयुष्यात 'टाइप २' मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.

काय आहेत लक्षणं?

मधुमेहाची विशिष्ट अशी लक्षणे नसतात किंवा अगदी सूक्ष्म लक्षणे असतात. यामुळे मधुमेहाकडे दुर्लक्ष केले जाते व तो गुप्तपणे शरीरात वाढत राहातो. एखाद्याचे वजन जास्त असणे, अपुरी शारीरिक हालचाल, वय ४५ किंवा त्यापेक्षा जास्त असणे किंवा मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असणे अशा स्थितींमध्ये जागरूक राहाणे महत्त्वाचे असते. मधुमेह हा एक पारंपरिक, प्रगतीशील आजार असल्याने रक्तातील साखरेची पातळी प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी लक्षणे कशी ओळखावीत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सामान्य लक्षणांमध्ये वाढती तहान, वारंवार लघवी होणे, जास्त भूक लागणे आणि हळूहळू बरे होणारे फोड यांचा समावेश होतो. याशिवाय मानेवरील काळी त्वचा, अस्पष्ट दृष्टी, योनिमार्गात संक्रमण, यीस्ट संसर्ग, मूत्राशयाचा संसर्ग, त्वचेचे संक्रमण, डोके दुखणे, लैंगिक कार्यात अडथळे, चिडचिड, वजन कमी होणे, खाज सुटणे, श्वासाला वास येणे, हातापायात वेदना, कोरडे तोंड आणि मळमळ अशीही काही मधुमेहाची लक्षणे आहेत.

चाचणी आहे महत्त्वाची

जर एखाद्या व्यक्तीला तहान वाढणे आणि वारंवार लघवी होणे अशी मधुमेहाची लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यादृच्छिक रक्तशर्करा चाचणी, उपाशी पोटी रक्तशर्करा चाचणी, A1C चाचणी यासह विविध चाचण्यांद्वारे मधुमेहाचे निदान केले जाऊ शकते. यामुळे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे मोजमाप शक्य होते. मधुमेहाचे निदान झाल्यास उपचारांमध्ये इन्सुलिन, तोंडी औषधे, शारीरिक व्यायाम आणि आहारातील बदल यांचा समावेश असू शकतो.

मधुमेहग्रस्त व्यक्तीला आयुष्यभर उपचार घेण्याची आणि नियमित पाठपुराव्याची गरज असते. मधुमेहाची औषधे घेतल्याने ग्लायसेमिक नियंत्रण वाढते. यामुळे गुंतागुंत टाळता येते आणि अधिक योग्य रोगनिदान होण्यास हातभार लागतो. संशोधनात असे दिसून आले आहे की, मधुमेह असलेल्या व्यक्ती सातत्याने A1C पातळी ७% पेक्षा कमी राखून त्यांच्यातील गुंतागुंत होण्याचा धोका कमी करू शकतात.