मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  बदलत्या सीझनमध्ये स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी अशा प्रकारे वापरा काकडी

बदलत्या सीझनमध्ये स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी अशा प्रकारे वापरा काकडी

Oct 06, 2022, 10:48 AM IST

    • How to Use Cucumber on Skin : बदलत्या वातावरणाचा तुमच्या स्किनवर परिणाम होत असतो. त्यासाठी त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तुमची स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे काकडीचा वापर करु शकता.
स्किन केअरसाठी काकडीचा वापर

How to Use Cucumber on Skin : बदलत्या वातावरणाचा तुमच्या स्किनवर परिणाम होत असतो. त्यासाठी त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तुमची स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे काकडीचा वापर करु शकता.

    • How to Use Cucumber on Skin : बदलत्या वातावरणाचा तुमच्या स्किनवर परिणाम होत असतो. त्यासाठी त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तुमची स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे काकडीचा वापर करु शकता.

Best Ways to Use Cucumber on Skin : जस जसे हवामान बदलते, तसतसे तुमच्या स्किनची चमक हरवू लागते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्वचेचे हायड्रेशन कमी होणे आणि त्वचा कोरडी पडणे. या कारणामुळे त्वचा खूप निस्तेज दिसते. अशा परिस्थितीत त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी काकडीचा वापर करावा. यामुळे त्वचा केवळ हायड्रेट होत नाही तर त्वचेच्या इतर समस्याही दूर होतात. चला तर जाणून घेऊया स्किनवर कशी वापरावी काकडी

ट्रेंडिंग न्यूज

World Red Cross Day 2024: का साजरा केला जातो जागतिक रेडक्रॉस दिन? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

Turmeric Tea Benefits: सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचा चहा! वजन कमी होण्यासोबतच दूर राहतील ‘हे’ आजार

Joke of the day : भाजी चांगली झाली नाही असं मुलानं म्हणताच ती जेव्हा नवऱ्याला विचारते…

World Ovarian Cancer Day: गॅस आणि ब्लोटिंगही असू शकतात गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणं, अजिबात करू नका दुर्लक्ष

काकडीचे जेल

काकडीचे जेल बनवण्यासाठी सर्वप्रथम काकडी घ्या, सोलून घ्या आणि धुवा. आता काकडी किसून घ्या. ते पिळून त्याचा रस काढा. आता यात थोडे थोडे एलोवेरा जेल घेऊन मिक्स करा. तुमचे जेल तयार होईल पण लक्षात ठेवा की एलोवेरा जेल मध्ये एकसोबत काकडीचा ज्यूस टाकायचं नाही. यामुळे ते खूप पातळ होईल. आता रात्री झोपण्यापूर्वी ते चेहऱ्याला लावा आणि झोपा.

काकडीचा फेस पॅक

काकडीच्या फेस पॅकची ही रेमेडी तुम्हाला फनी वाटेल कारण तुम्हाला वाटेल की तुम्ही काकडीचा रायता बनवणार आहात, पण प्रत्यक्षात तुम्हाला हायड्रेशन फेस पॅक तयार करावा लागेल. हे बनवण्यासाठी आधी काकडी किसून घ्या. आता ते दोन चमचे दही मध्ये मिक्स करा. आता ते संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा.

काकडी आणि बटाटा

बटाट्यात काकडी मिसळल्यानेही झटपट चमक येते. यासाठी प्रथम काकडी आणि बटाटे बारीक करून मिक्स करावे. आता २० मिनिटे चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेच्या समस्या बर्‍याच प्रमाणात दूर होतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग