मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urfi Javed: कपड्यांवरून वाद सुरू असतानाच उर्फी जावेदने केला कहर; टॉपलेस व्हिडीओ शेअर करत म्हणतेय...

Urfi Javed: कपड्यांवरून वाद सुरू असतानाच उर्फी जावेदने केला कहर; टॉपलेस व्हिडीओ शेअर करत म्हणतेय...

Jan 18, 2023, 01:42 PM IST

    • Urfi Javed Topless Video: एकीकडे उर्फीच्या कपड्यांवरून जोरदार टीका सुरू असताना, दुसरीकडे ती चक्क टॉपलेस होऊन व्हिडीओ शेअर करत आहे.
Urfi Javed

Urfi Javed Topless Video: एकीकडे उर्फीच्या कपड्यांवरून जोरदार टीका सुरू असताना, दुसरीकडे ती चक्क टॉपलेस होऊन व्हिडीओ शेअर करत आहे.

    • Urfi Javed Topless Video: एकीकडे उर्फीच्या कपड्यांवरून जोरदार टीका सुरू असताना, दुसरीकडे ती चक्क टॉपलेस होऊन व्हिडीओ शेअर करत आहे.

Urfi Javed Topless Video: अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद सध्या तिच्या फॅशनमुळे सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. एकीकडे तिच्या कपड्यांवरून जोरदार टीका सुरू असताना, दुसरीकडे ती चक्क टॉपलेस होऊन व्हिडीओ शेअर करत आहे. नुकताच उर्फी जावेद हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात उर्फी टॉपलेस अवतारात दिसली आहे. वाद सुरू असतानाच उर्फीने पुन्हा एकदा बोल्ड व्हिडीओ शेअर केल्याने ती प्रसिद्धी झोतात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'तुला पाहते रे' मालिकेतील अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागम, नवा प्रोमो प्रदर्शित

महेश कोठारेंची कमाल! मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार इन्स्पेक्टर महेश आणि लक्ष्याची धमाल! कशी? वाचाच...

निलेश साबळेच्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’मध्ये श्रेया, कुशल आणि भारत का नाहीत? अभिनेत्याने थेट दिले उत्तर!

ये राम तो रॅम्बो निकला रे! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये अभिरामचा डॅशिंग अंदाज पाहून लीलाही हैराण!

टॉपलेस होण्याची उर्फीची ही पहिलीच वेळ नाही. या आधी देखील उर्फी जावेद हिने अनेकदा टॉपलेस व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. मात्र, आता जेव्हा उर्फी तिच्या कपड्यांमुळेच वादात अडकली आहे, त्याचवेळी तिने असा व्हिडीओ शेअर केल्याने पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. उर्फी जावेदच्या या व्हिडीओने सोशल मीडियाचा पारा चांगलाच वाढवला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद केवळ अंतर्वस्त्र परिधान केलं आहे. तर, शरीराचा वरील भाग तिने वेणीने झाकण्याचा प्रयत्न केला आहे.

उर्फी जावेदचा हा बोल्ड व्हिडीओ पाहून नेटकरी देखील हैराण झाले आहेत. अनेकांनी तिच्या या व्हिडीओ कमेंट्स करत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, उर्फीने नेहमीप्रमाणेच तिचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज दाखवला आहे. कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना उर्फी नेहमीच सडेतोड उत्तर देत असते. सध्या देखील उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या दरम्यान सुरू असलेल्या वादामुळे हे प्रकरण प्रचंड चर्चेत आलं आहे.

भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याशी झालेल्या ट्वीटवॉरमध्ये उर्फी जावेद एकही संधी सोडत नाहीये. आतापर्यंत तिने सतत काहीना काही ट्वीट करत चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. उर्फी जावेद तिच्या कपड्यांवरून अनेकदा ट्रोल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उर्फीच्या कपड्यांवरून अनेकांनी तिच्यावर टीका केली. मात्र, उर्फीने प्रत्येकाला सडेतोड उत्तर दिलं.

विभाग