मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pallavi Joshi: शो मस्ट गो ऑन... दुखरा पाय घेऊन पल्लवी जोशी पुन्हा चित्रीकरणासाठी सज्ज!

Pallavi Joshi: शो मस्ट गो ऑन... दुखरा पाय घेऊन पल्लवी जोशी पुन्हा चित्रीकरणासाठी सज्ज!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 18, 2023 12:25 PM IST

Pallavi Joshi Accident : अपघातानंतर पल्लवी जोशी पुन्हा एकदा सेटवर परतली आहे. दुखरा पाय घेऊन तिने पुढील चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे.

Pallavi Joshi
Pallavi Joshi

Pallavi Joshi Accident : ‘द काश्मीर फाईल्स’ फेम अभिनेत्री पल्लवी जोशी हिचा आगामी चित्रपटाच्या सेटवर नुकताच अपघात झाला होता. या अपघातात पल्लवी जोशी जखमी झाली होती. यानंतर पल्लवीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता अभिनेत्री पुन्हा एकदा सेटवर परतली आहे. दुखरा पाय घेऊन तिने पुढील चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे. याची माहिती स्वतः विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, ‘पल्लवी जोशीच्या वतीने मी सगळ्या चाहत्यांचे आभार मानू इच्छितो. चित्रीकरणादरम्यान तिच्या पायावरून गाडी गेली होती. तिच्या पायाच्या हाडाला दुखापत झाली आहे. तिचा पाय बरा होण्यासाठी वेळ लागणार आहे. मात्र, शो मस्ट गो ऑन म्हणत ती लंगडतच सेटवर चित्रीकरणासाठी परतली आहे.’

‘द काश्मीर फाईल्स’ फेम अभिनेत्री आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची पत्नी पल्लवी जोशी सध्या ‘द व्हॅक्सीन वॉर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरू आहे. अशा परिस्थितीत कामात व्यस्त असलेल्या पल्लवीचा सेटवरच अपघात झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैदराबादमध्ये चित्रपटाच्या सेटवर एका कारने तिला धडक दिली, ज्यात पल्लवी जखमी झाली होती.

शूटिंगदरम्यान एका वाहनाने नियंत्रण गमावले आणि अभिनेत्रीला जोरदार धडक दिली होती. यादरम्यान पल्लवी जोशी जखमी झाली होती. मात्र, आता ती पुन्हा एकदा या चित्रपटाच्या सेटवर परतली आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘द व्हॅक्सीन वॉर’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे शूटिंगही नुकतेच सुरू झाले होते. या चित्रपटात पल्लवी जोशी महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

IPL_Entry_Point