मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: ‘पठाण’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात; शाहरुखसाठी मुंबईच्या प्रसिद्ध थिएटरने मोडला नियम!

Pathaan: ‘पठाण’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात; शाहरुखसाठी मुंबईच्या प्रसिद्ध थिएटरने मोडला नियम!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 18, 2023 11:04 AM IST

Pathaan Advance Booking: मुंबईतील सर्वात मोठे सिंगल स्क्रीन थिएटर गेटी 'पठाण'साठी आपला अनेक वर्षांचा नियम मोडणार आहे.

Pathaan
Pathaan

Pathaan Advance Booking: बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटासाठी सगळेच उत्सुक आहेत. ‘पठाण’ हा चित्रपट रिलीज व्हायला आता काहीच दिवस उरले आहेत. दरम्यान या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. शाहरुख खान देखील त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतत आहे. शाहरुख खानचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक दिसत आहेत.

चार वर्षांनंतर आपल्या आवडत्या अभिनेत्याला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते या चित्रपटाचे आगाऊ बुकिंगही करत आहेत. परदेशात ‘पठाण’ चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू झाली असून, २० जानेवारीपासून भारतातही सुरू होणार आहे. 'पठाण' हा चित्रपट २५ जानेवारीला भारतासह जगभरात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत.

‘पठाण’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अवघ्या पाच दिवस आधी म्हणजे २० जानेवारीपासून अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात होणार आहे. व्यापार विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे. तरण यांनी सोशल मीडियावर ट्विट करत लिहिले की, ‘प्रतीक्षा संपली... २० जानेवारीपासून 'पठाण'चे अॅडव्हान्स बुकिंग... #YRF ने 20 जानेवारी 2023 पासून #पठाणचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात येणार आहे आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे.’

मुंबईतील सर्वात मोठे सिंगल स्क्रीन थिएटर गेटी 'पठाण'साठी आपला अनेक वर्षांचा नियम मोडणार आहे. गेटी थिएटरमध्ये सकाळी ९ वाजता 'पठाण'चा पहिला शो सुरू होणार आहे. यासाठी शाहरुख खानच्या फॅन क्लबने संपूर्ण थिएटर बुक केले आहे. गेटी हे सर्वात प्रतिष्ठित चित्रपटगृहांपैकी एक आहे. या थिएटरमध्ये सुरुवातीपासूनच एक नियम आहे की, कोणत्याही चित्रपटाचा पहिला शो दुपारी १२ वाजता सुरू होतो. मात्र, 'पठाण' बाबत लोकांमध्ये असलेली क्रेझ पाहून या थिएटरने आपला अनेक वर्षांचा जुना नियम मोडून 'पठाण'चा पहिला शो सकाळी ९ वाजता बुक केला.

IPL_Entry_Point