मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urfi Javed: उर्फी जावेदला दिग्दर्शकाने दिली जीवे मारण्याची धमकी?

Urfi Javed: उर्फी जावेदला दिग्दर्शकाने दिली जीवे मारण्याची धमकी?

Aarti Vilas Borade HT Marathi

Apr 17, 2023, 02:03 PM IST

    • Urfi Javed: उर्फीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
Urfi Javed

Urfi Javed: उर्फीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

    • Urfi Javed: उर्फीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सतत काहीना काही पोस्ट करून ती चर्चेत राहत असते. उर्फी तिच्या हटके फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. रविवारी उर्फीला एका दिग्दर्शकाने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर उर्फीने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

उर्फीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटले की, 'मला कोणी तरी नीरज पांडेच्या ऑफिसमधून फोन केला. समोरच्या व्यक्तीने मला दिग्दर्शकाच्या असिस्टंट असल्याचे सांगितले आणि सरांनी मला भेटायला बोलावले आहे असे म्हटले. त्यावर मी उत्तर देते कोणालाही भेटण्यापूर्वी मला त्या प्रोजेक्टविषयी जाणून घ्यायला आवडेल. ते ऐकून त्या व्यक्तीला राग आला. तुझी नीरज पांडेचा अपमान करण्याची हिंमत कशी झाली?'

Urfi

पुढे ती म्हणाली, 'माझ्या गाडीचा नंबर त्या व्यक्तीला माहिती असल्याचे त्याने सांगितले. माझ्याविषयी सर्व माहिती आहे. माझा मारुन-मारून जीव घेतला पाहिले याच लायकीची आहे मी. कारण मी कपडे घालत नाही असे समोरची व्यक्ती म्हणत होती. मी त्या व्यक्तीला भेटण्यास नकार दिला म्हणून त्याने मला धमकी दिली.'

दिग्दर्शक नीरज पांडेने यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी अ वेडनेसडे, बेबी आणि स्पेशनल २६ या सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

विभाग