मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urfi Javed: काय? उर्फीला कपड्यांमुळे रेस्टॉरंटच्या दारात रोखलं, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Urfi Javed: काय? उर्फीला कपड्यांमुळे रेस्टॉरंटच्या दारात रोखलं, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Aarti Vilas Borade HT Marathi

Apr 27, 2023, 04:27 PM IST

    • Urfi Javed Controversies: उर्फीला अतरंगी फॅशनमुळे एका रेस्टॉरंटमध्ये एण्ट्री देण्यास नकार दिला. मात्र नंतर उर्फीने त्याच रेस्टॉरंट बाहेर धिंगाणा घातला आहे.
Urfi Javed

Urfi Javed Controversies: उर्फीला अतरंगी फॅशनमुळे एका रेस्टॉरंटमध्ये एण्ट्री देण्यास नकार दिला. मात्र नंतर उर्फीने त्याच रेस्टॉरंट बाहेर धिंगाणा घातला आहे.

    • Urfi Javed Controversies: उर्फीला अतरंगी फॅशनमुळे एका रेस्टॉरंटमध्ये एण्ट्री देण्यास नकार दिला. मात्र नंतर उर्फीने त्याच रेस्टॉरंट बाहेर धिंगाणा घातला आहे.

अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सतत काहीना काही पोस्ट करून ती चर्चेत राहत असते. उर्फी तिच्या हटके फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. मात्र, यावेळी उर्फीला तिच्या फॅशनमुळे एका रेस्टॉरंटमध्ये एण्ट्री देण्यास नकार दिला. यावरुन अभिनेत्रीने चांगलाच गोंधळ घातला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Kshitij Zarapkar Passed Away: मराठी अभिनेते क्षितिज झारापकर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

कपिलच्या शोमध्ये सनी असं काय म्हणाला की बॉबी देओलच्या डोळ्यात आलं पाणी? Viral video बघाच

अमृता खानविलकर नवरा हिमांशूसोबत फोटो का नाही शेअर करत? स्वतःच कारण सांगताना म्हणाली...

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

टेलीचक्करने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी फोटोग्राफर्ससोबत मजामस्ती करताना दिसत आहे. त्यानंतर ती एका रेस्टॉरंटच्या मॅनेजरवर संतापलेली दिसत आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या...
वाचा: पत्नीला घाबरवण्यासाठी अभिनेत्याने केला सुसाइड प्रँक, झाला मृत्यू

उर्फी नेहमीच अतरंगी कपडे घालून मुंबईत फिरताना दिसते. नुकतीच एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती. मात्र एण्ट्री करण्यापूर्वीच उर्फीला थांबवण्यात आले. ती अशा कपड्यांमध्ये रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करु शकत नाही असे मॅनेजरने म्हटले. ते ऐकून उर्फी भडकली आणि त्या रेस्टोरंटच्या मॅनेजरसोबत वाद घालू लागली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये तो मॅनेजर उर्फीला बोलताना दिसत आहे की, 'मॅडम तुम्ही अशा कपड्यांमध्ये आत जाऊ शकत नाही.' त्यावर त्या मॅनेजरवर ओरडत उर्फी म्हणाली, 'मी कोण आहे माहितेय का? माझं नाव उर्फी आहे उर्फी. जाऊन आत सांगा उर्फी जावेद आलीय.' त्यानंतर मॅनेजर उर्फीला शांत करण्याचा प्रयत्न करचो. मात्र जर कोणाचं ऐकलं तर ती उर्फी कसली. उर्फीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विभाग