मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tamasha Live Box Office Collection: 'तमाशा लाइव्ह' ते 'हिट', वाचा किती आहे कमाई

Tamasha Live Box Office Collection: 'तमाशा लाइव्ह' ते 'हिट', वाचा किती आहे कमाई

Payal Shekhar Naik HT Marathi

Jul 17, 2022, 06:17 PM IST

    • (Box Office Collection of Tamasha Live)या आठवड्यात बहुचर्चित मराठी चित्रपट 'तमाशा लाइव्ह' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचं सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं.
तमाशा लाइव्ह

(Box Office Collection of Tamasha Live)या आठवड्यात बहुचर्चित मराठी चित्रपट 'तमाशा लाइव्ह' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचं सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं.

    • (Box Office Collection of Tamasha Live)या आठवड्यात बहुचर्चित मराठी चित्रपट 'तमाशा लाइव्ह' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचं सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं.

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni tamasha live box office collection)आणि दिग्दर्शक संजय जाधव यांचा 'तमाशा लाइव्ह' नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात एक वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पत्रकारितेचा वेगळा चेहरा दाखवणारा 'तमाशा लाइव्ह' १५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. त्यासोबत तापसी पन्नूचा 'शाबास मिथू' आणि राजकुमार राव यांचा 'हिट' देखील प्रदर्शित झाले आहेत. या पैकी कोणत्याही चित्रपटाने म्हणावी तशी कमाई केलेली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

कमाईच्या बाबतीत 'तमाशा लाइव्ह' ने पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ३० लाखांची कमाई केली आहे. देशभरात २५० स्क्रीनवर हा चित्रपट दाखवण्यात येत आहे. चित्रपटासाठी साधारण ४ ते ५ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. पहिल्या दिवशीच्या मानाने या चित्रपटाची कमाई चांगली मानली जातेय. आता शनिवारी आणि रविवारी ही कमाई वाढण्याची शक्यता आहे. या पूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईच्या मानाने ही कमाई कमी असली तरी चित्रपटाचा विषय पाहता हा आकडा चांगला मानला जातोय. तर दुसरीकडे 'शाबास मिथू'ने देखील पहिल्या दिवशी काही खास कमाई केली नाही. भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारीत या बायोपिकने पहिल्या दिवशी केवळ ४० लाखांची कमाई केली आहे.

परंतु, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झालेली पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी चित्रपटाने ५५ लाखांची कमाई केली आहे. म्हणजे या चित्रपटाने एकूण ९५ लाखांची कमाई केली आहे. रविवारी यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असलेला 'हिट' ने चांगली कमाई करत पहिल्या दिवशी कोटींचा आकडा पार केला आहे. दोन दिवसात याची कमाई १ कोटी ९० लाखांवर पोहोचली आहे. इतर चित्रोताच्या मानाने ही कमाई चांगली आहे.

विभाग