मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sushmita Sen: ताली बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी!; सुष्मिता सेनच्या आगमी चित्रपटाची चर्चा

Sushmita Sen: ताली बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी!; सुष्मिता सेनच्या आगमी चित्रपटाची चर्चा

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 06, 2022, 12:58 PM IST

    • Taali First Look: सुष्मिताचा ट्रान्सजेंटर लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
सुष्मिता सेन (HT)

Taali First Look: सुष्मिताचा ट्रान्सजेंटर लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

    • Taali First Look: सुष्मिताचा ट्रान्सजेंटर लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनही चर्चेत आहे. या चर्चा सुष्मिता सेन आयपीएलचे पहिले फाऊंडर ललित मोदी यांना डेट करत असल्यामुळे रंगल्या होत्या. अशातच आता सुष्मिताचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती ट्रान्सजेंडच्या भूमिकेत दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘सोढी’ हरवलाय! आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

सुष्मिताने आर्या या सीरिजमधून कमबॅक केले. ही सीरिज सुपरहिट ठरली होती. त्यानंतर या सीरिजचा दुसरा सिझन देखील आला. त्या सिझनला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता सुष्मिता एका नवीकोरी सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये ती ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसत आहे. या सीरिजमधील तिचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाचा: 'तुझ्या धर्माचा खेळ करशील का?', सैफवर संतापले मुकेश खन्ना

सुष्मिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सुष्मिताने ट्रान्सजेंडर गौरी सावंतच्या लूकमधील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, 'ताली बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! मला एका अतिशय सुंदर व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपटाती निर्मिती करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

सुष्मिताने शेअर केलेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या फोटोमध्ये तिने साडी नेसली आहे, कपाळाला मोठी लाल टिकली, गळ्यात माळ आणि हातात घड्याळ घातले आहे. या लूकमध्ये सुष्मिता अतिशय वेगळी दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर सुष्मिताच्या या लूकची चर्चा रंगली आहे. चाहते आतुरतेने या सीरिजची वाट पाहात आहेत.

विभाग