मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shamshera Box Office: रिकामं थिएटर, कॅन्सल शोज; ‘५ दिवसात 'शमशेरा'चा डब्बा गुल

Shamshera Box Office: रिकामं थिएटर, कॅन्सल शोज; ‘५ दिवसात 'शमशेरा'चा डब्बा गुल

Payal Shekhar Naik HT Marathi

Jul 27, 2022, 02:15 PM IST

    • रणबीर कपूरचा 'शमशेरा'((shamshera 5th day collection))बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकलेला नाही. कमाई सतत घसरत आहे आणि पाचव्या दिवशी चित्रपटाची कमाई आणखी कमी झाली आहे.
शमशेरा

रणबीर कपूरचा 'शमशेरा'((shamshera 5th day collection))बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकलेला नाही. कमाई सतत घसरत आहे आणि पाचव्या दिवशी चित्रपटाची कमाई आणखी कमी झाली आहे.

    • रणबीर कपूरचा 'शमशेरा'((shamshera 5th day collection))बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकलेला नाही. कमाई सतत घसरत आहे आणि पाचव्या दिवशी चित्रपटाची कमाई आणखी कमी झाली आहे.

रणबीर कपूर आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'शमशेरा'ने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली आहे. (shamshera box office collection)हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करेल अशी अपेक्षा होती पण आता तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. आता १०० कोटी तर सोडाच पण चित्रपट कदाचित ५० कोटीही कमावणार नसल्याच्या चर्चा होत आहेत. प्रेक्षक येत नसल्याने चित्रपटगृह चालकांनी चित्रपटाचे शो रद्द केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

‘सोढी’ हरवलाय! आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

किती होती पाचव्या दिवसाची कमाई

शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'शमशेरा'ने पहिल्या ३ दिवसात एकूण ३१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पण चौथ्या दिवशी त्याची कमाई बॉक्स ऑफिसवर आणखी खराब झाली आणि त्याने केवळ २ कोटी ८५ लाख एवढाच व्यवसाय केला. रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी चित्रपट आणखी खाली आला आहे आणि त्याने केवळ २ कोटी २५ लाख कमाई केली. अशा प्रकारे या चित्रपटाने आतापर्यंत ३६ कोटी १० लाख एवढी कमाई केली आहे.

अशी आहे 'शमशेरा'ची आतापर्यंतची कमाई

शुक्रवार - १० कोटी रु

शनिवार - १० कोटी रु

रविवार - ११ कोटी रु

सोमवार - २. ८५ कोटी

मंगळवार - २. २५ कोटी

आतापर्यंत एकूण कमाई - ३६ . १० कोटी रुपये

पुढेही आशा नाही

रणबीरने 'शमशेरा' मधून तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. अशा स्थितीत तो प्रेक्षक त्याला डोक्यावर घेतील, असा विश्वास होता. चित्रपटातील रणबीर कपूरच्या अभिनयाचे कौतुक झाले असले तरी चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडलेली नाही. आता या चित्रपटाकडून अपेक्षा करणं निरर्थक ठरणार आहे कारण 'एक व्हिलन रिटर्न्स' हा मल्टीस्टारर चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर, जॉन अब्राहम, दिशा पाटनी आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याच्या रिलीजमुळे 'शमशेरा'ची कमाई आणखी कमी होण्याची शक्यता आहे.