मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: इंदूरमध्ये हिंदू संघटनांच्या निषेधानंतर 'पठाण'चा पहिला शो रद्द

Pathaan: इंदूरमध्ये हिंदू संघटनांच्या निषेधानंतर 'पठाण'चा पहिला शो रद्द

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 25, 2023, 05:13 PM IST

    • Shahrukh Khan: बिहार आणि यूपीमध्ये देखील चित्रपटाला विरोध करण्यात आला आहे. चित्रपटाचे पोस्टर्स फाडून टाकण्यात आले
पठाण (HT)

Shahrukh Khan: बिहार आणि यूपीमध्ये देखील चित्रपटाला विरोध करण्यात आला आहे. चित्रपटाचे पोस्टर्स फाडून टाकण्यात आले

    • Shahrukh Khan: बिहार आणि यूपीमध्ये देखील चित्रपटाला विरोध करण्यात आला आहे. चित्रपटाचे पोस्टर्स फाडून टाकण्यात आले

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 'पठाण' हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आज २५ जानेवारी रोजी संपूर्ण देशात प्रदर्शित झाला आहे. जवळपास ५ हजार पेक्षा जास्त स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र मध्य प्रदेशमधील इंदूर येथे काही हिंदू संघटनांनी चित्रपटाचा निषेध केला. त्यामुळे चित्रपटाचा पहिला शो रद्द करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिराम खरंच लीलाच्या कानाखाली मारणार? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत येणार जबरदस्त ट्विस्ट

सरगमची अट मान्य करून अक्षरा तिला घरात घेऊन येईल का? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये येणार ट्वीस्ट

सायली देवासमोर खोटी शपथ घेणार की लग्नाचं सत्य कबुल करणार? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या पाचव्या आरोपीला अटक! गुन्हेगारांची केली होती मदत

पठाण या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात दीपिकाने भगव्या रगंची बिकिनी परिधान केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. गुजरातमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता बिहार आणि यूपीमधील अनेक ठिकाणी चित्रपटाचे लावलेले पोस्टर्स फाडून टाकण्यात आले. तसेच इंदूरमधील पहिला शो देखील रद्द करण्यात आला आहे.
वाचा: भर कार्यक्रमात तब्बूनं घेतलं अजय देवगणचं चुंबन; व्हिडीओ व्हायरल

सिंगल स्क्रीन थिएटर्ससाठी शाहरुख खानने एक खास पोस्ट लिहिली आहे. यात शाहरुखने त्याच्या बालपणीची आठवण शेअर केली आहे. शाहरुखने लिहिले की, ‘लहानपणी सगळे चित्रपट सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये पाहिले आहेत. त्याची एक वेगळीच मजा असते. दुआ, प्रार्थना आणि प्रेयर करतो की, मला आणि सगळ्यांना यश मिळो. री ओपनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा..’

गेली दोन वर्ष कोरोना महामारीने सगळ्याच क्षेत्रांचे कंबरडे मोडले होते. यात सगळ्यात मोठा फटका बसला तो सिंगल स्क्रीन थिएटर्सला. अनेक महिन्यांपासून बंद पडलेली ही चित्रपटगृहे अद्यापपर्यंत बंदच होती. मात्र, शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे ही चित्रपटगृहे पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. ‘पठाण’ची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून आता बंद पडलेली सिंगल स्क्रीन थिएटर्स सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विभाग