मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tabu: भर कार्यक्रमात तब्बूनं घेतलं अजय देवगणचं चुंबन; व्हिडीओ व्हायरल
तब्बू
तब्बू (HT)

Tabu: भर कार्यक्रमात तब्बूनं घेतलं अजय देवगणचं चुंबन; व्हिडीओ व्हायरल

24 January 2023, 17:32 ISTAarti Vilas Borade

Tabu kiss Ajay Devgan : भोला चित्रपटाच्या टीझर लॉंच दरम्यान तब्बून अजयला किस केले आहे. किस करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Tabu kiss Ajay Devgan : लवकरच अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू मुख्य भूमिकेत असणारा 'भोला' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. हा टीझर प्रदर्शित करण्यासाठी मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान तब्बूने अजय देवगणला किस केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'भोला' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अजय आणि तब्बूने मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी एका पत्रकाराने 'अजय तू हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील अतिशय भोला अभिनेता म्हणून ओळखला जातो. लोक म्हणतात तू कधीच तुझं स्पॉटिंग करत नाही. कोणत्याच वादात तू अडकत नाहीस. तू इतका भोला का आहेस?' असा प्रश्न विचारला होता. त्यावर अजयने 'मला असे वाटते की काम शांततेमध्ये करायला हवे. कारण स्पॉटिंग करुन किंवा वाद निर्माण करुन कोणी फार पुढे जाऊ शकत नाही. कामवरुनच माणसाची ओळख निर्माण होते. जर तुमचे काम ठिक असेल तर तुम्हाला स्वत:ला काही बोलायची गरज नाही' असे उत्तर दिले.
वाचा:'बांबू'त लागणार प्रेमाचे बदामी बाण; गाण्यातील समीर चौघुलेंचा लूक पाहून होईल हसू अनावर

पुढे तब्बूला देखील अजयसोबत काम करण्याचा अनुभव विचारला होता. त्यावर तब्बूने, 'अजय सोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला असतो. तो नेहमी कोणतची गोष्ट जास्त करत नाही. कथेला, सीनला जितकी गरज आहे तितकेच काम तो करतो. दिग्दर्शक म्हणून त्याच्यासोबत काम करण्याचा एक चांगला अनुभव म्हणजे हा खूप त्याला तंत्रज्ञानाविषयी खूप माहिती आहे. काय करायला हवे आणि काय नाही हे त्याला योग्य पद्धतीने माहिती आहे.'

भोला या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती अजय देवगणने केली आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी सहित तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.

विभाग