मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan : मध्यरात्री भिंत तोडून दोन तरुण शिरले शाहरुखच्या 'मन्नत'मध्ये

Shah Rukh Khan : मध्यरात्री भिंत तोडून दोन तरुण शिरले शाहरुखच्या 'मन्नत'मध्ये

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 03, 2023, 08:20 AM IST

    • Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याची भींत तोडून आत जाणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मन्नत (HT)

Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याची भींत तोडून आत जाणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

    • Shah Rukh Khan : शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याची भींत तोडून आत जाणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'पठाण' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. जगभरात चित्रपटाने जवळपास १ हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशातच आता शाहरुखच्या बंगल्यात दोन तरुणांनी मध्यरात्री भिंत तोडून आत जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘रोशन सिंह सोढी’ साकारण्यासाठी गुरुचरण सिंहला किती मानधन मिळायचे?

अभिरामचं लग्न मोडण्यामागचं सत्य कुणाला कळू शकेल का? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत ट्वीस्ट

कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमांचक वळण

भारतीय क्रिकेट टीमसाठी ‘अश्वत्थामा’ बनले अमिताभ बच्चन! सोशल मीडियावरील Viral Video पाहिलात का?

भिंत तोडून शाहरुखच्या बंगल्यात प्रवेश करणारे दोन तरुण गुजरातमधील आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दोन्ही तरुणांचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ते २० वर्षे वयोगटातील दोन तरुणांना ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश करताना पकडलं आहे.
वाचा: 'या' चित्रपटातून मधुर भांडारकर करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, हृता दुर्गुळे साकारणार भूमिका

समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण हे शाहरुखचे चाहते आहेत. ते गुजरातवरुन शाहरुखला भेटण्यासाठी आले आहेत. मात्र, विनापरवाना खासगी मालमत्तेत प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.

सूत्रांनी ईटाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे. शाहरुख त्याचा आगामी चित्रपट 'जवान'चे चित्रीकरण करत होता. मन्नतबाहेरील सुरक्षा रक्षकांनी मध्यरात्री दोन तरुण भींत तोडून बंगल्यात शिरत असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

विभाग