मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नानंतर सलमान खानवर मजेशीर मीम्स व्हायरल

Salman Khan: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नानंतर सलमान खानवर मजेशीर मीम्स व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi

Feb 08, 2023, 10:48 AM IST

    • Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नानंतर नेटकऱ्यांनी मीम्स तयार केले आहेत. हे मीम्स पाहून तुम्हाला हसू अनावर होईल.
सलमान खान (HT)

Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नानंतर नेटकऱ्यांनी मीम्स तयार केले आहेत. हे मीम्स पाहून तुम्हाला हसू अनावर होईल.

    • Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नानंतर नेटकऱ्यांनी मीम्स तयार केले आहेत. हे मीम्स पाहून तुम्हाला हसू अनावर होईल.

बॉलिवूडमधील मोस्ट इलिजिबल बॅचरल म्हणून अभिनेता सलमान खान ओळखला जातो. तो लग्न कधी करणार हा जणू काही जागतिक प्रश्नच झाला आहे. पण अनेकदा सलमानची सिंगल असल्यामुळे खिल्ली उडवली जाते. नुकताच बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नानंतर नेटकऱ्यांनी सलमान खानवर भन्नाट मिम्स तयार केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अभिरामचं लग्न मोडण्यामागचं सत्य कुणाला कळू शकेल का? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत ट्वीस्ट

कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमांचक वळण

भारतीय क्रिकेट टीमसाठी ‘अश्वत्थामा’ बनले अमिताभ बच्चन! सोशल मीडियावरील Viral Video पाहिलात का?

नैना लग्नाला पोहोचणारच नाही असा राहुलने आखला डाव, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय घडणार?

सिद्धार्थ आणि कियाराचे ७ फेब्रुवारी रोजी जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न पार पडले. त्यांचा लग्नातील लूक पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करत सर्वांना लग्नातील लूक दाखवला. त्यानंतर नेटकऱ्यांनी सिंगल असलेल्या सलमान खानवर निशाणा साधत भन्नाट मीम्स तयार केले आहेत.
वाचा: भारताच्या नकाशावर पाय दिल्याने अक्षय कुमार ट्रोल, यूजर्सने म्हटले 'देशद्रोही'

एका नेटकऱ्याने एश्वर्या-अभिषेक, विकी-कतरिना, रणबीर-आलिया आणि कियारा-सिद्धार्थच्या लग्नातील फोटो कोलाज करुन शेअर केला आहे. त्या खाली सलमानचा रागात असलेला फोटो शेअर केला आहे. हे मीम्स पाहून तुम्हाला हसू येईल.

दुसऱ्या नेटकऱ्याने एका एक्सचे लग्न झाले, दुसऱ्या एक्सचे लग्न झाले, दुसऱ्या एक्सच्या एक्सचे लग्न झाले. या सगळ्यात तू (सलमान खान) असे म्हटले आहे. त्यावर नेटकऱ्याने कमेंट करत सलमान भाईचा विचार करुन वाईट वाटते असे म्हटले आहे.

सलमान खान हा सर्वात पहिला व्यक्ती होता ज्याने बिग बॉस या शोमध्ये सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाची हिंट दिली होती. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा लग्न सोहळा जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये पार पडला. त्यांच्या लग्नाला संपूर्ण बॉलिवूड उपस्थित होते. करण जोहर, मनीष मल्होत्रा, शाहिद कपूर, मलायका अरोरा, मीरा राजपूत आणि इतर सेलिब्रिटी रविवारी दुपारीच जैसलमेरला पोहोचले होते. कियारा अडवाणीची खास मैत्रीण असलेली ईशा अंबानीही या लग्नात सहभागी होण्यासाठी जैसलमेरला पोहोचली होती. सिद्धार्थ आणि कियाराने ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या सेटवरच दोघांच्या प्रेमकहाणीची चर्चा झाली होती.

विभाग