मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Akshay Kumar: भारताच्या नकाशावर पाय दिल्याने अक्षय कुमार ट्रोल, यूजर्सने म्हटले 'देशद्रोही'

Akshay Kumar: भारताच्या नकाशावर पाय दिल्याने अक्षय कुमार ट्रोल, यूजर्सने म्हटले 'देशद्रोही'

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 07, 2023 10:42 AM IST

Akshay Kumar: या व्हिडीओमध्ये अक्षयसोबत मौनी रॉय, दिशा पटानी, सोनम बाजवा व नोरा फतेही पृथ्वीवर चालताना दिसत आहे

अक्षय कुमार
अक्षय कुमार (HT)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सतत चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप होताना दिसत आहेत. अशातच अक्षयचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत बॉलिवूडमधील काही अभिनेत्री देखील दिसत आहेत. पण अक्षयला या व्हिडीओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

अक्षयने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्यासह मौनी रॉय, दिशा पटानी, सोनम बाजवा व नोरा फतेही पृथ्वीवर चालताना दिसत आहे. ‘नॉर्थ अमेरिका टूर’साठी केलेल्या या प्रमोशन व्हिडीओमध्ये अक्षय भारताच्या नकाशावर चालत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अक्षयला ट्रोल केले आहे.
वाचा:: उर्फीच्या या फॅशनचं करायचं काय?; हा व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावरून जाल!

एका यूजरने कमेंट करत “लाज नाही वाटत का? भारतालाही नाही सोडलं तू कॅनडियन कुमार” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'देशद्रोही' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने “भारताचा थोडा तरी आदर करायचा होता” असे म्हणत अक्षयला सुनावले आहे.

अक्षय कुमारने हा व्हिडीओ शेअर करत 'नॉर्थ अमेरिकामध्ये मनोरंजनासाठी कलाकार १०० टक्के प्रयत्न करत आहेत. तुमचे सीटबेल्ट लावा आणि मार्च महिन्यात येत आहोत' या आशयाचे कॅप्शन दिले आहे. एकंदरीत अक्षय एका एअरलाइनचे प्रमोशन करत असल्याचे समोर आले आहे. पण त्याचा हा व्हिडीओ पाहून त्याला ट्रोल केले जात आहे.

IPL_Entry_Point