मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urfi Javed Viral Video : उर्फीच्या या फॅशनचं करायचं काय?; हा व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावरून जाल!

Urfi Javed Viral Video : उर्फीच्या या फॅशनचं करायचं काय?; हा व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावरून जाल!

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 06, 2023 12:40 PM IST

Urfi Javed Viral Video: उर्फीने या नव्या व्हिडीओमध्ये पूर्ण कपडे घातल्याचे भासत आहे. पण जेव्हा तुम्ही आरशामध्ये पाहाल तेव्हा तिने ड्रेसचे काय केले हे दिसेल

उर्फी जावेद
उर्फी जावेद (HT)

कधी काचांचे तुकडे, तर कधी मोबाईल आणि चार्जर, उर्फी जावेद कशापासून आपला आऊटफिट तयार करेल याचा काही नेम नाही. हटके फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिचा फॅशन सेन्स पाहून भलेभले लोक हैराण होतात. नेहमीच बोल्ड लूक धारण करणाऱ्या उर्फीचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या नव्या व्हिडीओमध्ये तिने पूर्ण कपडे घातल्याचे भासत आहे. पण जेव्हा तुम्ही आरशामध्ये पाहाल तेव्हा तिने ड्रेसचे काय केले आहे हे स्पष्ट होईल.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेत्री उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फीने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. या पूर्ण कपड्यांमध्ये उर्फी सुंदर दिसत आहे. मात्र तिच्या मागे एक आरसा आहे. कॅमेरा जेव्हा त्या आरशाकडे वळतो तेव्हा उर्फीने पूर्ण कपडे घातले आहेत की नाही हे स्पष्ट होते. सध्या सोशल मीडियावर उर्फीच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: टीव्हीवरील संस्कारी सुनेचा बाथरुममधील Video viral

उर्फीची फॅशन शैली हटके असली, तरी लोकांचे लक्ष वेधून घेण्यात ती यशस्वी ठरते. मात्र, सध्या याच फॅशन शैलीमुळे उर्फी जावेद ट्रोल होताना दिसत आहे. उर्फी जावेद अनेक मालिकांमधून छोट्या छोट्या भूमिका साकारताना दिसली. मात्र, ‘बिग बॉस ओटीटी’च्या माधमातून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

IPL_Entry_Point

विभाग