मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rakshabandhan Special: मालिकांमध्येही साजरी होणार राखी पौर्णिमा, दिसणार भावाबहिणीचं अतूट प्रेम

Rakshabandhan Special: मालिकांमध्येही साजरी होणार राखी पौर्णिमा, दिसणार भावाबहिणीचं अतूट प्रेम

Payal Shekhar Naik HT Marathi

Aug 11, 2022, 06:32 PM IST

• rakshabandhan in marathi serial: मालिकांमध्ये प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा होता. असंच आता रक्षाबंधनही मालिकांमध्ये साजरं होताना दिसणार आहे.
rakshabandhan

rakshabandhan in marathi serial: मालिकांमध्ये प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा होता. असंच आता रक्षाबंधनही मालिकांमध्ये साजरं होताना दिसणार आहे.

• rakshabandhan in marathi serial: मालिकांमध्ये प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा होता. असंच आता रक्षाबंधनही मालिकांमध्ये साजरं होताना दिसणार आहे.

रक्षाबंधन म्हणजे भावाबहिणीच्या अतूट नात्याचं बंधन. या सणाला बहीण आपल्या भावाला राखी बांधत त्याच्याकडून आपलं रक्षण करण्याचं वचन घेते. मालिकांमध्ये प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा होता. असंच आता रक्षाबंधनही मालिकांमध्ये साजरं होताना दिसणार आहे. अनेक मालिकांमध्ये आता रक्षाबंधना निमित्त खास भाग दाखवले जाणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Director Sangeeth Sivan: 'क्या कूल है हम' चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन

राहुलचा डाव अपयशी, कलाने शोधून काढले नैनाला! 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत वेगळे वळण

अभिरामला तयार करण्यासाठी लीला दुर्गाची मदत घेणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

बिग बॉस फेम वीणा जगतापचे छोट्या पडद्यावर पुनरागम, 'या' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार

ठिपक्यांची रांगोळी

‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत कानेटकर कुटुंब अप्पुला म्हणजेच अपूर्वाला राखी बांधताना दिसणार आहे. अपूर्वाने आपलं कुटुंब जोडून ठेवलं म्हणून तिला राखी बांधून ते आपलं प्रेम व्यक्त करणार आहेत.

राजा राणीची गं जोडी

'राजा राणीची गं जोडी' या मालिकेत पहिल्यांदाच राजश्री रणजितला राखी बांधणार आहे.

राजा राणीची गं जोडी

आई कुठे काय करते

'आई कुठे काय करते' मालिकेत देखील रक्षाबंधन विशेष भाग दाखवण्यात येणार आहे. यात देशमुख कुटुंबीय हे अरुंधतीच्या घरी जाताना दाखवण्यात येणार आहेत.

रंग माझा वेगळा

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपिका आणि कार्तिकी देखील एकमेकांना राखी बांधणार आहेत.

तुझेच मी गीत गात आहे

'तुझेच मी गीत गात आहे' मध्ये देखील पियू स्वराजला राखी बांधणार आहे.

भाग्य दिले तू मला

'भाग्य दिले तू मला' मध्ये देखील रक्षाबंधन साजरं होणार आहे.