मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raksha Bandhan Review: हुंडा प्रथेवर भाष्य करत हळुवार उलगडत जाणारी हृदयस्पर्शी कथा

Raksha Bandhan Review: हुंडा प्रथेवर भाष्य करत हळुवार उलगडत जाणारी हृदयस्पर्शी कथा

Payal Shekhar Naik HT Marathi

Aug 11, 2022, 12:05 PM IST

    • rakshabandhan movie best or worst:चित्रपटात भाऊ-बहिणीचं नातं अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आलं आहे. जिथे प्रेम आहे पण संघर्ष देखील आहे. हा चित्रपट दोन तासांचा आहे आणि कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबासह हा चित्रपट पाहू शकता.
रक्षाबंधन

rakshabandhan movie best or worst:चित्रपटात भाऊ-बहिणीचं नातं अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आलं आहे. जिथे प्रेम आहे पण संघर्ष देखील आहे. हा चित्रपट दोन तासांचा आहे आणि कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबासह हा चित्रपट पाहू शकता.

    • rakshabandhan movie best or worst:चित्रपटात भाऊ-बहिणीचं नातं अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आलं आहे. जिथे प्रेम आहे पण संघर्ष देखील आहे. हा चित्रपट दोन तासांचा आहे आणि कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबासह हा चित्रपट पाहू शकता.

akshay kumar rakshabandhan movie review good or bad:  काय आहे कथा: 'रक्षाबंधन' हा चित्रपट म्हणजे जुन्या दिल्लीतील चांदनी चौक येथे राहणारा लाला केदारनाथ (अक्षय कुमार) ची कथा आहे. लालाचं पाणीपुरीचं वडिलोपार्जित दुकान असून, ते गेल्या दोन-तीन पिढ्यांपासून सुरू आहे. या दुकानातील पाणीपुरी खाल्ल्याने आपल्या घरी मुलगा होईल, असा विश्वास असलेल्या लालाच्या दुकानासमोर गर्भवती महिलांची मोठी रांग लागलेली असते. लालाने आपल्या आईला वचन दिलं होतं की जेव्हा त्याच्या चार बहिणींचं लग्न होईल तेव्हाच तो लग्न करेल.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

लालाच्या चार बहिणींची भूमिका सादिया खतीब, दीपिका खन्ना, स्मृती श्रीकांत आणि सचमीन कौर यांनी केली आहे. तर सपना (भूमी पेडणेकर) हे लालाचं बालपणीचं प्रेम आहे. लालाच्या चार बहिणींचं लग्न कधी होईल याची सपना वाट पाहतेय कारण त्यानंतरच ती लालासोबत लग्न करू शकते. बहिणींची लग्न लावण्यासाठी लालाला कशा कशाला सामोरं जावं लागतं ही रक्षाबंधन या चित्रपटाची कथा आहे.

काय आहे खास : चित्रपटाची एक उत्तम गोष्ट म्हणजे तो तुम्हाला रडवतोच पण हसवतो देखील. चित्रपटाच्या पूर्वार्धात अनेक मजेशीर क्षण आहेत, तर उत्तरार्धात अनेक हृदयस्पर्शी दृश्य आहेत. चित्रपटाची कथा अगदी सोपी आहे आणि प्रेक्षक म्हणून तुम्हाला खिळवून ठेवते. खरी कथा त्यात भरकटू नये म्हणून हुंडा हा मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने चित्रपटात दाखवण्यात आला आहे. चित्रपटात तुम्हाला फ्लॅशबॅकही अनेकदा पाहायला मिळेल.

पाहावा की नाही: चित्रपटात भाऊ-बहिणीचे नाते अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आले आहे. जिथे प्रेम आहे पण संघर्षदेखील आहे. हा चित्रपट दोन तासांचा आहे आणि कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबासह चित्रपट पाहू शकता. चित्रपट पाहताना तुम्ही हसाल, रडाल आणि घरी येताना हुंड्याच्या प्रश्नावर नक्कीच विचार कराल.

विभाग