मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rakhi Sawant: राखी सावंतला खरंच अटक झाली होती? पती आदिल दुर्राणीने केला मोठा खुलासा!

Rakhi Sawant: राखी सावंतला खरंच अटक झाली होती? पती आदिल दुर्राणीने केला मोठा खुलासा!

Jan 21, 2023, 07:58 AM IST

    • Rakhi Sawant Arrest: अभिनेत्री राखी सावंत अटकेच्या वृत्तामुळे प्रचंड चर्चेत होती. मात्र, आता राखीचा पती आदिल याने या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे.
Rakhi Sawant

Rakhi Sawant Arrest: अभिनेत्री राखी सावंत अटकेच्या वृत्तामुळे प्रचंड चर्चेत होती. मात्र, आता राखीचा पती आदिल याने या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे.

    • Rakhi Sawant Arrest: अभिनेत्री राखी सावंत अटकेच्या वृत्तामुळे प्रचंड चर्चेत होती. मात्र, आता राखीचा पती आदिल याने या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे.

Rakhi Sawant Arrest: बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ अभिनेत्री राखी सावंत काहीना काही कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. १९ जानेवारीला राखी सावंतला अंबोली पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर आली होती. मॉडेल शर्लिन चोप्रा हिने राखीवर काही आरोप केले होते. राखीने आपले आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले करत, मीडियाला देखील दाखवले, असे शर्लिन चोप्रा म्हणाली होती. त्यानंतर शर्लिनने एफआयआर देखील दाखल केला होता. मात्र, आता राखीचा पती आदिल याने या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. त्याने राखील अटक झालीच नाही, असे म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विनोदाची पातळी इतकी खाली गेलीये? कुशल बद्रिके आणि हेमांगी कवीच्या ‘मॅडनेस मचायेंगे’वर संतापले प्रेक्षक

तेजश्री प्रधानच्या मालिकेने पुन्हा मारली बाजी! जुई गडकरी ठरली नंबर वन! पाहा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट

एक-दोन नव्हे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘सोढी’ वापरत होता १० बँक अकाऊंट! पोलिसांनी केला नवा खुलासा

अभिराम जाहिरातीसाठी तयार होणार; पण दुर्गाचं सत्य समोर येणार? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत रंजक वळण

राखी सावंतला आंबोली पोलिसांनी अटक केली नसून, ती स्वतः चौकशीसाठी पोलीस ठाण्यात गेल्याचे आदिलने सांगितले. मीडियाशी संवाद साधताना आदिल म्हणाला की, 'राखीला बऱ्याच दिवसांपासून चौकशीसाठी बोलावले जात होते, पण कामामुळे ती जाऊ शकली नाही. आमचा दुबईमध्ये एक शो होता त्यानंतर ती बिग बॉस मराठीच्या घरात गेली. बाहेर आल्यावर ती तिच्या आईसोबत व्यस्त होती. राखीच्या आईवर कॅन्सरचे उपचार सुरू आहेत. त्यामुळे तिचा खूप वेळ तिथेच गेला.’

आदिलने पुढे म्हटले की, 'आंबोली पोलिसांनी राखीला सांगितले की, सध्या तिच्या आईची नाजूक तब्येत लक्षात घेता, जेव्हाही राखील वेळ मिळेल तेव्हा ती पुढील चौकशीसाठी येऊ शकते. त्यामुळे राखीच स्वत: पोलीस स्टेशनला गेली होती. तिला अटक झाली नाही. तिने केवळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपला जबाब नोंदवला. पोलिसांनी तिचा फोन घेतला असून, तो लवकरच परत केला जाईल. राखीला अटके झाली, अशी अफवा पसरतेय याची माहिती आम्हाला संध्याकाळी समजली. असे काही पसरवले जाऊ शकते याची आम्हाला आधीच कल्पना असती, तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आमचा जबाब नोंदवून झाल्यानंतर लगेच मीडियासमोर खुलासा केला असता.’

मॉडेल अभिनेत्री शर्लिन चोप्राने तक्रार दाखल केल्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत, नोव्हेंबर २०२२मध्ये राखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आधी देखील अनेकदा राखीला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या प्रकरणी अद्याप चौकशी सुरू आहे.

विभाग