मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raju Srivastava Funeral: अंत्यविधीला 'सेल्फी', सुनील पालने व्यक्त केला संताप

Raju Srivastava Funeral: अंत्यविधीला 'सेल्फी', सुनील पालने व्यक्त केला संताप

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 23, 2022, 09:28 AM IST

    • Raju Srivastava Death: २१ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले.
राजू श्रीवास्तव (HT)

Raju Srivastava Death: २१ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले.

    • Raju Srivastava Death: २१ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले.

अतिशय लोकप्रिय कॉमेडियन, अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. ११ ऑगस्ट रोजी हृदय विकाराचा झटका आल्यामुळे त्यांना दिल्लीमधील सरकारी रुग्णालय एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पण २१ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली. अनेक कलाकार त्यांच्या अंत्यविधीसाठी हजर होते. दरम्यान, कॉमेडियन सुनील पालचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने संताप व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Kshitij Zarapkar Passed Away: मराठी अभिनेते क्षितिज झारापकर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

कपिलच्या शोमध्ये सनी असं काय म्हणाला की बॉबी देओलच्या डोळ्यात आलं पाणी? Viral video बघाच

अमृता खानविलकर नवरा हिमांशूसोबत फोटो का नाही शेअर करत? स्वतःच कारण सांगताना म्हणाली...

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

चाहते हे आपला आवडता कलाकार दिसला की त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी वाटेल ते करत असतात. असेच काहीसे राजू श्रीवास्तव यांच्या अंत्यविधीच्या वेळी झाले. एक चाहता कोणताही विचार न करता राजू यांच्या अंत्यदर्शनसाठी आलेल्या सुनील पाल जवळ आला. त्याने सुनील पालला सेल्फी काढण्यासाठी विनंती केली. सर्वांनी त्या चाहत्याला समजावण्याचा प्रयत्न केला.
वाचा : 'चला सुटका झाली', राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर अभिनेत्याची वादग्रस्त कमेंट

सुनीलने देखील त्या चाहत्याला समजावले. पण तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. तो सतत सेल्फीसाठी विनंती करत होता. शेवटी सुनील त्या चाहत्यावर संतापला. हा घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्या चाहत्याला कमेंट करत सुनावले आहे.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल झालेले ज्येष्ठ विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. राजू श्रीवास्तव एम्समध्ये लाइफ सपोर्ट सिस्टमवर होते. १५ दिवसांनी व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर विनोदी कलाकार शुद्धीवर आले. मात्र, १ सप्टेंबर रोजी त्यांना १०० अंशांपर्यंत ताप आल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण २१ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेकजण सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. २२ सप्टेंबर रोजी दिल्लीतील निगम बोध घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विभाग