मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'पुष्पा' सापडला कायद्याच्या कचाट्यात, पोलिसात तक्रार दाखल

'पुष्पा' सापडला कायद्याच्या कचाट्यात, पोलिसात तक्रार दाखल

Jun 11, 2022, 09:43 PM IST

    • 'पुष्पा' चित्रपटाने अल्लू अर्जुनची (Allu Arjun)ब्रँड व्हॅल्यू वाढवली आहे. दरम्यान, तो आता कायदेशीर अडचणीत सापडला आहे. त्यांच्या एका जाहिरातीवरून हा सगळा वाद निर्माण झाला असून, तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुष्पा फेम अल्लु अर्जुन विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल

'पुष्पा' चित्रपटाने अल्लू अर्जुनची (Allu Arjun)ब्रँड व्हॅल्यू वाढवली आहे. दरम्यान, तो आता कायदेशीर अडचणीत सापडला आहे. त्यांच्या एका जाहिरातीवरून हा सगळा वाद निर्माण झाला असून, तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    • 'पुष्पा' चित्रपटाने अल्लू अर्जुनची (Allu Arjun)ब्रँड व्हॅल्यू वाढवली आहे. दरम्यान, तो आता कायदेशीर अडचणीत सापडला आहे. त्यांच्या एका जाहिरातीवरून हा सगळा वाद निर्माण झाला असून, तक्रार दाखल करण्यात आली आहे.

'पुष्पा' चित्रपटानंतर अल्लू अर्जुनची लोकप्रियता वाढली आहे. त्याच्या आगामी सिनेमांची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. 'पुष्पा'ने अल्लू अर्जुनची ब्रँड व्हॅल्यू वाढवली आहे. तो आता कायदेशीर अडचणीत सापडला आहे. त्यांच्या एका जाहिरातीवरून हा सगळा वाद निर्माण झाला असून, तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, एका एज्युकेशनल इंस्टिट्युटच्या जाहिरातीत खोटी माहिती दिल्याबद्दल अल्लू अर्जुनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अल्लू अर्जुनची जाहिरात दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती देत ​​असल्याचा दावा एका सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

मराठी मनोरंजन विश्वाची ‘मँगो डॉली’! अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे गाजलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

काय आहे प्रकरणः

सामाजिक कार्यकर्ते कोठा उपेंद्र रेड्डी यांनी अल्लू अर्जुनविरोधात अंबरपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. न्यूड एजंसी आयएएनएसने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, रेड्डी यांनी अशी खोटी माहिती देणाऱ्या जाहिरातीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. खरं तर, ६ जून रोजी अल्लू अर्जुनने श्री चैतन्य एज्युकेशन इंस्टिट्युशनच्या जाहिरातीमध्ये आयआयटी आणि एनआयटीच्या रँकर्सची माहिती दिली होती.

आणखी एका जाहिरातीवरही झाली टीकाः

लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी अल्लू अर्जुन आणि श्री चैतन्य एज्युकेशनल इंस्टिट्युशन्सवर कारवाई करावी, असे आवाहन रेड्डी यांनी केले. याआधी अल्लू अर्जुन फूड डिलिव्हरी अॅपच्या मार्केटिंगसाठी टीकेचा शिकार झाला होता.

अनेक फिल्म पाइपलाइनमध्येः

वर्कफ्रंटवर, अल्लू अर्जुन लवकरच 'पुष्पा 2' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय त्याच्याकडे कोराटला शिवा, आर मुरुगदास, बोयापति श्रीनू आणि प्रशांत नील यांच्यासोबत एक चित्रपट आहे.

विभाग