मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Oscars 2023: दीपिका पादूकोणने चाहत्यांना दिली गूडन्यूज, ‘ऑस्कर’शी आहे कनेक्शन

Oscars 2023: दीपिका पादूकोणने चाहत्यांना दिली गूडन्यूज, ‘ऑस्कर’शी आहे कनेक्शन

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 03, 2023, 09:57 AM IST

    • Deepika Padukone: बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादूकोणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. काय आहे ही गूडन्यूज जाणून घ्या...
दीपिका पादूकोण (REUTERS)

Deepika Padukone: बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादूकोणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. काय आहे ही गूडन्यूज जाणून घ्या...

    • Deepika Padukone: बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादूकोणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. काय आहे ही गूडन्यूज जाणून घ्या...

चित्रपटसृष्टीमध्ये सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार म्हणजे 'ऑस्कर.' लवकरच ऑस्कर २०२३ हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वीच ९५व्या अकादमी पुरस्कारांसाठी निवडलेल्या चित्रपटांची नावे जाहीर करण्यात आली. आता बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादूकोणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ऑस्करशी संबंधीत गूडन्यूज दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

मराठी मनोरंजन विश्वाची ‘मँगो डॉली’! अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे गाजलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

दीपिकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऑस्कर प्रेझेंटर्सची यादी शेअर केली आहे. या यादीमध्ये दीपिकाचे नाव असल्याचे दिसत आहे. भारतीयांसाठी ही अभिमानाचीबाब आहे. तिने आजवर अनेक जागतिक कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. त्यानंतर आता तिची ऑस्कर प्रेझेंटर्समध्ये निवड झाल्यावर सर्वांना आनंद झाला आहे.
वाचा: सलिम खान यांनी हेलन यांच्याशी दुसरं लग्न का केलं? 'हे' होतं कारण

ऑस्कर २०२३मध्ये प्रेझेंटर्स म्हणून रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, जेनिफर कॉनेली, एरियाना डीबोस, सॅमुअल एल जॅक्सन, ड्वेन जॉनसन, माइकल बी जॉर्डन, ट्रॉय कोत्सुर, जोनाथन मेजर्स, मेलिसा मॅक्कार्थी, जेनेल मोनाए, क्वेस्टलव, जो सलदाना आणि डोनी येन यांची निवड करण्यात आली आहे. या यादीमध्ये दीपिकाने स्थान कमावत भारतीयांच्या मान अभिमानाने उंचावल्या आहेत.

ऑस्कर २०२३ हा पुरस्कार सोहळा १२ मार्चला आयोजित करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा कॉमेडियन जिमी किमेल होस्ट करणार आहे. त्यामुळे सर्वांमध्ये ऑस्कर सोहळ्याची उत्सुकता पाहायला मिळते.

ऑस्कर नामांकनात ‘आरआरआर’ने मिळवली जागा
ऑस्करने ९५व्या अकादमी पुरस्कारांसाठी निवडलेल्या चित्रपटांची नावे जाहीर केली आहेत. यंदा ऑस्करच्या शर्यतीत भारतातील २ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' श्रेणीमध्ये ‘छेल्लो शो’ला नामांकन जाहीर झाले आहे. तर, ‘आरआरआर’च्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला ‘मूळ गाणे’ अर्थात ‘ओरिजिनल साँग’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. ‘छेल्लो शो’सोबतच 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' श्रेणीतील इतर चित्रपटांमध्ये 'अर्जेंटिना १९८५', 'द क्वाईट गर्ल', 'द ब्लू काफ्तान' आणि इतर काही चित्रपटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यंदाच्या ऑस्कर शर्यतीत पाकिस्तानातील चित्रपटाने देखील स्थान मिळवले आहे. पाकिस्तानी चित्रपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानी चित्रपट 'जॉयलँड'ला देखील या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.