मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gadkari: देशाची ओळख जेव्हा रस्त्यांनी होईल तेव्हा मी आनंदी; 'गडकरी'चा टीझर प्रदर्शित

Gadkari: देशाची ओळख जेव्हा रस्त्यांनी होईल तेव्हा मी आनंदी; 'गडकरी'चा टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 09, 2023, 12:28 PM IST

    • Gadkari Teaser: नितीन गडकरींच्या जीवनावर आधारित 'गडकरी' हा सिनेमा २७ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Nitin Gadkari Biopic

Gadkari Teaser: नितीन गडकरींच्या जीवनावर आधारित 'गडकरी' हा सिनेमा २७ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    • Gadkari Teaser: नितीन गडकरींच्या जीवनावर आधारित 'गडकरी' हा सिनेमा २७ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्या बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बायोपिकचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आता देशाच्या राजकारणातील मोठे नाव असलेले नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित देखील सिनेमा येणार आहे. या चित्रपटाचे नाव 'गडकरी' असे असून नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विनोदाची पातळी इतकी खाली गेलीये? कुशल बद्रिके आणि हेमांगी कवीच्या ‘मॅडनेस मचायेंगे’वर संतापले प्रेक्षक

तेजश्री प्रधानच्या मालिकेने पुन्हा मारली बाजी! जुई गडकरी ठरली नंबर वन! पाहा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट

एक-दोन नव्हे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘सोढी’ वापरत होता १० बँक अकाऊंट! पोलिसांनी केला नवा खुलासा

अभिराम जाहिरातीसाठी तयार होणार; पण दुर्गाचं सत्य समोर येणार? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत रंजक वळण

नितीन गडकरी त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच एक प्रगतशील भारत नावारूपास आला. 'गडकरी' चित्रपटाच्या टीझरची सुरुवातच ही "या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्याने होईल, तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी..." या ओळीने होतेय. त्यामुळे त्यांची बांधिलकी ही केवळ राजकारणाशी नसून समाजकारणाशीही आहे, याचा प्रत्यय येतो. टीझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. परंतु ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नितीन गडकरींचा हा जीवनपट प्रेक्षकांना २७ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात पाहाता येणार आहे.
वाचा: सेन्सॉर बोर्डने का चालवली होती ‘ओएमजी २’च्या २७ दृश्यांवर कात्री? अक्षय कुमार अखेर बोललाच!

नितीन गडकरी या नावाला भारतात जितका सन्मान आहे तितकेच हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदरणीय आहे. अशा व्यक्तिमत्वाला जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर आऊट झाले होते. त्यावेळी नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र ही उत्सुकता टीझरमध्येही कायम राहिली आहे. आता या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक अनुराग राजन भुसारी म्हणतात, "नितीन गडकरी हे राजकारणातील एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे. पोस्टर प्रदर्शनानंतर मला अनेकांचे फोन आले. अनेकांनी मला नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार असल्याचे विचारले. मात्र ही उत्सुकता लवकरच दूर होईल. एक सर्वसामान्य कार्यकर्ता, समाजसेवक ते प्रमुख कॅबिनेट मंत्री हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच रंजक आहे. त्यांचे हे दुसरं जग जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. खासगी आयुष्यात नितीन गडकरी कसे होते आणि कसे आहेत, हे 'गडकरी'मधून प्रेक्षकांना जाणून घेता येईल."

विभाग