मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nava Gadi Nava Rajya: 'नवा गडी नवं राज्य' मालिकेत विराज इनामदारची एण्ट्री, कोण आहे हा विराज?

Nava Gadi Nava Rajya: 'नवा गडी नवं राज्य' मालिकेत विराज इनामदारची एण्ट्री, कोण आहे हा विराज?

Aarti Vilas Borade HT Marathi

Jun 01, 2023, 10:18 AM IST

    • Nava Gadi Nava Rajya: 'नवा गडी नवं राज्य' मालिकेत विराज आणि राघवाची टक्कर होणार आहे.
Nava Gadi Nava Rajya

Nava Gadi Nava Rajya: 'नवा गडी नवं राज्य' मालिकेत विराज आणि राघवाची टक्कर होणार आहे.

    • Nava Gadi Nava Rajya: 'नवा गडी नवं राज्य' मालिकेत विराज आणि राघवाची टक्कर होणार आहे.

'नवा गडी नवं राज्य' या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या मालिकेचे जितके कौतुक करावे, तितके कमी आहे. जेव्हापासून या मालिकेची सुरवात झाली, त्या क्षणापासून मालिकेला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद आणि प्रेम दिले. आनंदी, राघव, रमा, वर्षा, चिंगी ही सगळीच पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून वसली आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले आहे. आता या मालिकेत विराज इनामदारची एण्ट्री झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

मराठी मनोरंजन विश्वाची ‘मँगो डॉली’! अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे गाजलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

"नवा गडी नवं राज्य" हि मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत, कश्यप परुळेकर, अनिता दाते आणि पल्लवी पाटील अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेत आहे, आणि ते प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. आता या मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे कारण ‘विराज इनामदारची’ एण्ट्री होणार आहे.

कॉलेजपासून सर्व गोष्टींमध्ये राघवचा प्रतिस्पर्धी राहिलेला आणि राघवला नेहेमी कमी दाखवण्याच्या प्रयत्नात असलेला विराज राघवसाठी काही नवीन आव्हान घेऊन येणार का? राघव या आव्हानांना कसा समोर जाईल? हे पाहणे औसुक्याच असणार आहे. अभिनेता सौरभ गोखले विराज इनामदारच्या भूमिकेत दिसणार आहे. सौरभ गोखले हा प्रसिद्ध अभिनेता असून त्याने वेगवेगळ्या मालिकेतून आणि चित्रपटातून आपली छाप सोडली आहे.

विभाग