मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' औरंगजेबाची स्वप्न धुळीस मिळवणाऱ्या रणरागिनीचा चित्रपट लवकरच

'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' औरंगजेबाची स्वप्न धुळीस मिळवणाऱ्या रणरागिनीचा चित्रपट लवकरच

Aarti Vilas Borade HT Marathi

Aug 23, 2022, 03:43 PM IST

    • Chhatrapati Tararani: हा चित्रपट जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या "मोगलमर्दीनी महाराणी ताराबाई" या ग्रंथावर आधारीत आहे.
छत्रपती ताराराणी (HT)

Chhatrapati Tararani: हा चित्रपट जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या "मोगलमर्दीनी महाराणी ताराबाई" या ग्रंथावर आधारीत आहे.

    • Chhatrapati Tararani: हा चित्रपट जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या "मोगलमर्दीनी महाराणी ताराबाई" या ग्रंथावर आधारीत आहे.

औरंगजेबासारख्या स्वराज्यावर टपून बसलेल्या दिल्लीपती बलाढ्य मोगल पातशहाला महाराष्ट्राच्या मातीत कायमचा संपवण्यात स्वराज्यातील स्त्रिया देखील पुरुष योध्यांपेक्षा कमी नाही, हे दाखवून देणाऱ्या आणि मराठ्यांचा देदीप्यमान संग्राम असणाऱ्या भारतीय इतिहासाला पराक्रमाच्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या वीरांगना म्हणजे महाराणी छत्रपती ताराबाई. त्यांच्याच जीवनावर आधारीत 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या चित्रपटाचा मुहूर्त आज संपन्न झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिराम खरंच लीलाच्या कानाखाली मारणार? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत येणार जबरदस्त ट्विस्ट

सरगमची अट मान्य करून अक्षरा तिला घरात घेऊन येईल का? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये येणार ट्वीस्ट

सायली देवासमोर खोटी शपथ घेणार की लग्नाचं सत्य कबुल करणार? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या पाचव्या आरोपीला अटक! गुन्हेगारांची केली होती मदत

मुंबईमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली असून या चित्रपटासाठी चित्रनगरी मध्ये भव्य सेट उभारला आहे. संपूर्ण सेट, हा इतिहासातील पराक्रमांमध्ये न्हाऊन निघाला आहे. 'प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि 'मंत्रा व्हिजन' निर्मित हा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उत्तम कथानकाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विविध विषयांवरचे दर्जेदार चित्रपट जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी 'प्लॅनेट मराठी' कायम अग्रेसर असतं.

हा चित्रपट जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या "मोगलमर्दीनी महाराणी ताराबाई" या ग्रंथावर आधारीत असून, "मोगलमर्दीनी छत्रपती ताराराणी" या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कोंडीराम निकम यांचे आहेत आणि राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

मराठी साम्राज्याचा औरंगजेबाच्या मनात पुन्हा दबदबा निर्माण करणाऱ्या छत्रपती ताराराणींची व्यक्तिरेखा मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारत आहे. शिवाय चित्रपटाला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात, ''छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच या चित्रपटाद्वारे आपला लखलखीत इतिहास आम्ही प्रेक्षकांच्या समोर आणीत आहोत. प्रेक्षकांना हा अनोखा चित्रपट नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे."

विभाग