मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  जगासाठी प्रसिद्ध गायक होता पण घरी वडील पट्ट्याने मारायचे, वाचा मायकल जॅक्सनबद्दल

जगासाठी प्रसिद्ध गायक होता पण घरी वडील पट्ट्याने मारायचे, वाचा मायकल जॅक्सनबद्दल

Payal Shekhar Naik HT Marathi

Jun 25, 2022, 12:22 PM IST

    • (michael jackson death anniversary)आजच्याच दिवशी त्याने या जगाचा निरोप घेतला मात्र चाहत्यांच्या मनातून तो कधीही गेला नाही. जन्मल्यापासूनच त्याचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू होता.
मायकल जॅक्सन

(michael jackson death anniversary)आजच्याच दिवशी त्याने या जगाचा निरोप घेतला मात्र चाहत्यांच्या मनातून तो कधीही गेला नाही. जन्मल्यापासूनच त्याचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू होता.

    • (michael jackson death anniversary)आजच्याच दिवशी त्याने या जगाचा निरोप घेतला मात्र चाहत्यांच्या मनातून तो कधीही गेला नाही. जन्मल्यापासूनच त्याचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू होता.

आपल्या अप्रतिम गाण्यांनी आणि नृत्याने प्रेक्षकांचं अफाट प्रेम आणि प्रसिद्धी मिळवलेला मायकल जॅक्सन (michael jackson) याचा २५ जून २००९ साली मृत्यू झाला. आजच्याच दिवशी त्याने या जगाचा निरोप घेतला मात्र चाहत्यांच्या मनातून तो कधीही गेला नाही. जन्मल्यापासूनच त्याचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू होता. त्याने आपल्या गायनाने आणि नृत्यशैलीने संपूर्ण जगाला भुरळ पाडली पण घरात मात्र त्याचे वडील त्याला पट्ट्याने मारत असत. अख्या जगाचा लाडका असणारा मायकल घरातल्यांना नकोसा होता का?

ट्रेंडिंग न्यूज

Director Sangeeth Sivan: 'क्या कूल है हम' चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन

गौतमी पाटीलचं नशीब चमकलं! ‘द महाराष्ट्र फाइल्स’ सिनेमातील हिंदी गाण्यावर थिरकरणार

राहुलचा डाव अपयशी, कलाने शोधून काढले नैनाला! 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत वेगळे वळण

अभिरामला तयार करण्यासाठी लीला दुर्गाची मदत घेणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

मायकलचा जन्म २९ ऑगस्ट रोजी अमेरिकेतल्या एका छोट्याश्या शहरात झाला. त्याच्या भावाचा एक पॉप बॅण्ड होता. त्यामुळे त्यालाही गाण्यांची आवड लागली. १९६४ साली त्याने आपल्या भावाचा पॉप बॅण्ड ग्रुप जॉईन केला. १९८२ साली मायकलचा पहिला गाण्यांचा अल्बम आला आणि त्याचं नाव जगभरात गाजू लागलं. 'थ्रिलर' या अल्बमने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. मात्र घरात त्याचं काहीही चालत नसे. भावाच्या बॅण्डमध्ये गात असताना त्याच्याकडून एखादी चूक झाली तरी त्याचे वडील त्याला पट्ट्याने मारत. पुढे जेव्हा त्याला लोकप्रियता मिळाली तेंव्हाही ही परिस्थिती मुळीच बदलली नाही.

स्टेजवर असताना गायनात थोडी जरी चूक झाली तरी घरी आल्यावर वडील त्याला पट्ट्याने मारत. जगासाठी तो लोकप्रिय गायक आणि डान्सर होता. मात्र घरी तो गुपचूप आपल्या वडिलांचा मार सहन करत होता. या सगळ्याचा त्याच्यावर खूप वाईट परिणाम झाला होता. आपण आपल्या वडिलांना आवडत नाही अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली होती. परंतु, यामुळेच मायकलने पुढे कित्येक अनाथ मुलांचा सांभाळ केला. मायकलचा ‘थ्रिलर’ हा अल्बम जगातील सर्वाधिक विकला जाणारा अल्बम आहे. या अल्बमच्या 100 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत. तसेच, मायकेलच्या नावावर 39 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद आहे.

विभाग