मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kangana Ranut: कंगना रणौतची ट्विटरवर वापसी, पाहा काय आहे पहिले ट्वीट

Kangana Ranut: कंगना रणौतची ट्विटरवर वापसी, पाहा काय आहे पहिले ट्वीट

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 24, 2023, 06:17 PM IST

    • Kangana Ranut Back On Twitter: २०२० साली वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते.
कंगना रणौत (ht)

Kangana Ranut Back On Twitter: २०२० साली वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते.

    • Kangana Ranut Back On Twitter: २०२० साली वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते.

Kangana Ranut Tweet: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी विशेष ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगना ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे आपले मत मांडताना दिसते. २०२० साली काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते. आता कंगनाचे ट्विटरवर अकाऊंट पुन्हा सुरु झाल्याचे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मराठी मनोरंजन विश्वाची ‘मँगो डॉली’! अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे गाजलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

कंगनाने नुकताच तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केले आहे. 'सर्वांना माझा नमस्कार, पुन्हा ट्विटरवर येऊन मला चांगले वाटत आहे' या आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे. सध्या सोशल मीडियावर कंगनाचे हे ट्वीट चर्चेत आहे. चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनी कंगनाचे स्वागत केले आहे. कंगनाला पुन्हा ट्विटरवर पाहून सर्वांना आनंद झाला आहे.
वाचा: नवाजुद्दीनच्या पत्नी विरोधात आईनेच केली तक्रार, चौकशीसाठी पोलिसात हजर

यापूर्वी अमेरिकेचे डोनाल्ट ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु करण्यात आले होते. तेव्हा कंगनाचे देखील ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली होती. २०२१ साली अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर कॅपिटल हिलमध्ये हिंसेला उत्तेजन दिल्याचा आरोप करत ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट बंद केले होते. परंतु आता ट्विटर कंपनीची सूत्र जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलोन मस्क यांच्याकडे आल्यानंतर अखेरीस ट्रम्प यांचे ट्विटर खाते सुरू करण्यात आले. त्यापाठोपाठ कंगना रणौतचे देखील अकाऊंट सुरु करण्यात आले आहे.

कंगनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर मे २०२२मध्ये तिचा 'धाकड' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता. चित्रपटाचे बजेट ८५ कोटी रुपये होते. मात्र, चित्रपटाने २.५ कोटींची देखील कमाई केली नाही. आता कंगनाचा 'इमर्जंसी' हा चित्रपट येणार आहे. या चित्रटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.

विभाग