मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'इंग्लिश गाण्यावर लावणी करायला लावेन', झोलझालचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

'इंग्लिश गाण्यावर लावणी करायला लावेन', झोलझालचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi

Jun 23, 2022, 05:45 PM IST

    • या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सयाजी शिंदे असे एकूण २२ कलाकार आहेत.
झोलझाल (HT)

या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सयाजी शिंदे असे एकूण २२ कलाकार आहेत.

    • या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सयाजी शिंदे असे एकूण २२ कलाकार आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'झोलझाल.' हास्याची मेजवानी असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता अधिक ताणली गेली असून हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणार यांत शंकाच नाही. कलाकारांनी घातलेला गोंधळ ट्रेलर पाहून चित्रपटाची उत्सुकता वाढवणारा आहे. झोलझाल या चित्रपटात तब्बल २२ कलाकारांनी मिळून काय गोंधळ घातलाय हे येत्या १ जुलैला रसिक प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहणे नक्कीच रंजक ठरेल.

ट्रेंडिंग न्यूज

Actor Sahil Khan arrested: 'महादेव बेटिंग ॲप' प्रकरणी अभिनेता साहिल खानला १ मे पर्यंत पोलीस कोठडी

सलूनच्या बाहेर स्वत:चा फोटो पाहून संतोष जुवेकरने केली मेजशीर पोस्ट, म्हणाला 'अपून तो हिरो बनगया!'

बायकोचं सामान उचलून कुशल बद्रिके निघाला फिरायला, मजेशीर फोटो शेअर करत म्हणाला...

लंडनमध्ये राधिका मर्चंट- अनंत अंबानीसाठी पाकिस्तानी गायक अतिफ असलमने गायले गाणे, फोटो व्हायरल

'झोलझाल' चित्रपटात विविधांगी भूमिका साकारलेल्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळतेय. हास्याची कारंजे घेऊन हे कलाकार रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला येत्या १ जुलैला येत आहेत. या चित्रपटातील गाणी आणि चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर आधीच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, अंकुर वाढवे, विश्वजित सोनी, श्याम मसलकर, प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे सिनेकलाकार दिसणार असून या कलाकारांच्या भूमिका चित्रपटांत निव्वळ पर्वणीच ठरतील यांत शंकाच नाही. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलरमधून तुम्हाला कळेल की ही कलाकारांची मांदियाळी चित्रपटात नेमका काय धिंगाणा घालणार आहेत.

दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू पेलवली असून चित्रपटाची निर्मिती निर्माते गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना जी अग्रवाल यांनी केली. तर चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून सारिका गुप्ता आणि स्वप्निल गुप्ता यांनी बाजू सांभाळली. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता लिखित आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची बाजू प्रफुल-स्वप्नील आणि ललित रामचंद्र यांनी उत्तमरित्या पेलली आहे. माननीय अमेय खोपकरजी हे चित्रपटाचे वितरक म्हणून जबाबदारी पेलवत आहेत.

विभाग