मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The kerala Story: 'द केरळ स्टोरी' ओटीटी प्रदर्शनाबाबत निर्मात्यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

The kerala Story: 'द केरळ स्टोरी' ओटीटी प्रदर्शनाबाबत निर्मात्यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

Aarti Vilas Borade HT Marathi

Jun 02, 2023, 02:42 PM IST

    • The Kerala Story: गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
The Kerala Story

The Kerala Story: गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

    • The Kerala Story: गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटावर काही ठिकाणी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे तर काही ठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. राजकीय वर्तुळातील अनेकांनी या चित्रपटावर टीका केली. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, त्यावर निर्मात्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Director Sangeeth Sivan: 'क्या कूल है हम' चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन

राहुलचा डाव अपयशी, कलाने शोधून काढले नैनाला! 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत वेगळे वळण

अभिरामला तयार करण्यासाठी लीला दुर्गाची मदत घेणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

बिग बॉस फेम वीणा जगतापचे छोट्या पडद्यावर पुनरागम, 'या' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार

गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत निर्मात्यांना विचारताच ते म्हणाले की, 'आता पर्यंत आम्ही चित्रपटाचे डिजिटल हक्क विकलेले नाहीत. पण चित्रपटाचे हक्क खरेदी करण्यासाठी अनेक दिग्गज कंपन्या आमच्याकडे येत आहेत. मात्र, आम्ही कोणाचीही ऑफर स्वीकारलेली नाही.'

यापूर्वी जून महिन्यात 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट झी५ या ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप चित्रपटाचे हक्क विकले गेलेले नाही हे समोर आले आहे.

‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. यात अभिनेत्री अदा शर्मा हिच्यासोबत योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाने जवळपास २३१ कोटी रुपयांची कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. तर जगभरात चित्रपटाने २८४ कोटी रुपये कमावले आहेत.

विभाग